३१ वर्षांनंतर पुन्हा भरली तीच शाळा! बाखर्डी हायस्कूलमध्ये जुन्या मित्रांना पाहून गुरुजनही झाले भावूक

February 16, 2026 by Prakash Hande

School Alumni Meet : चंद्रपुर - जिल्हा परिषद हायस्कूल बाखर्डी ता. कोरपना येथील इयत्ता दहावी (शैक्षणिक वर्ष १९९६९७) च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा अत्यंत उत्साहात व थाटामाटात नुकताच पार पडला. तब्बल ३१ वर्षांनंतर एकत्र आलेल्या मित्र-मैत्रिणी व गुरुजनांच्या भेटीमुळे वातावरण भावनिक आणि आनंदमय झाले होते. (चंद्रपूर मनपा शाळेत प्रवेश घ्या, मालमत्ता कर पूर्णतः माफ, खासदार धानोरकरांची मोठी मागणी)

 

कार्यक्रमाला  रामटेके सर व रामटेके मॅडमचिने सरगेडाम सरगुरनुले सरचव्हाण सरदुर्गे सर तसेच मुख्याध्यापिका कोटेवार मॅडम उपस्थित होत्या. यावेळी श्रीमती शेवंताबाई मत्तेऍड. राजेंद्र जेनेकर (मुख्य प्रचारकअखिल भारतीय गुरुदेव सेवामंडळमहाराष्ट्र राज्य) तसेच धुर्वे सर (सहाय्यक शिक्षकमहात्मा गांधी विद्यालयगडचांदूर) यांचीही उपस्थिती लाभली.

 

कार्यक्रमाची सुरुवात माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या जुन्या वर्गखोलीत बसून परिचय सत्राने केली. त्यानंतर शाळेच्या प्रांगणात सावित्रीबाई फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत ऍड. सारिका हिरादेवेज्योती गेडाम व शालिनी बोंडे यांनी स्वागतगीताने केले. सर्व माजी शिक्षकांचा शालश्रीफळस्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

 

कार्यक्रमादरम्यान दुर्गे सर यांनी सादर केलेल्या गीताने उपस्थितांची मने जिंकली. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शाळेतील आठवणींना उजाळा दिला. ३० वर्षांनंतर गुरुजनांना भेटण्याचा विद्यार्थ्यांचा आनंद आणि आपल्या विद्यार्थ्यांना पुन्हा पाहण्याचा शिक्षकांचा आनंद स्पष्टपणे जाणवत होता. या स्नेहमेळाव्यामुळे गुरु-शिष्य नात्यातील आपुलकी अधिक दृढ झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. School Alumni Meet

 

यावेळी माजी शिक्षकांसह उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांचा शालश्रीफळस्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हंसराज कातकर यांनी तर प्रास्ताविक संजय धोटे यांनी केले. ॲड. राजेंद्र जेनेकर व ॲड. सारिका हिरादेवे-जेनेकर यांनी उपस्थित मान्यवरांना ग्रामगीता’ भेट देत गुरुदेव सेवामंडळाच्या कार्याची माहिती दिली तसेच शाळेसाठी आर्थिक मदत सुपूर्द केली. धुर्वे सर यांनीही शाळेला आर्थिक सहाय्य केले.

 

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अशोक पोतराजे निमणी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अशोक पोतराजे निमणीबंडू बुचुंडे व गितेश्वर टिपले यांनी विशेष मेहनत घेतली. भोजनासह सर्व व्यवस्था उत्कृष्टरीत्या पार पडल्याबद्दल आयोजकांचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले. एकंदरीतआठवणींना उजाळा देणाराभावनांनी ओथंबलेला आणि आनंददायी असा हा स्नेहमिलन सोहळा उत्साहात संपन्न झाला.

Leave a Comment

+