Ballarpur Gold Theft । बल्लारपूर-वरोरा बस प्रवासात महिलेचे १ लाखांचे दागिने लंपास

April 02, 2026 by Prakash Hande

Ballarpur Gold Theft : बल्लारपूर - बल्लारपूर, चंद्रपूर ते वरोरा या प्रवासादरम्यान महिलेच्या पर्स मधील असलेली दागिन्यांची डबी अज्ञाताने लांबवली, त्या पर्समध्ये सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख १ हजार ८५६ रुपयांचा ऐवज होता. (चंद्रपुरात भरदिवसा घरफोडी)

 

३२ वर्षीय प्रणाली भूपेंद्र झिलपे राहणार मौलाना आझाद वॉर्ड बल्लारपूर या १ एप्रिल रोजी वरोरा मध्ये वहिनीच्या घरी कार्यक्रम असल्याने सकाळी १० वाजता बल्लारपूर बस स्टॉप वरून चंद्रपूरला गेल्या. त्यानंतर चंद्रपुरातील मोठी बहीण भारती बोरुटकर यांच्या सोबत वणी बस ने वरोरा पोहोचल्या.

 

वरोरा शहरातील रत्नमाला चौकात भावासह दुचाकीने आईच्या घरी गेल्या, कार्यक्रम दुपारी २ वाजता असल्याने त्यांनी तयारी करण्यासाठी बॅग मधील दागिने बघितले असता ते आढळून आले नाही, त्या पर्स मध्ये सोन्याची पोत, मंगळसूत्र, सोन्याचे टॉप्स, सोन्याची अंगठी असा एकूण १ लाख १ हजार ८५६ रुपयांचा मुद्देमाल अज्ञाताने प्रवासात लांबविला असल्याचा संशय आल्याने त्यांनी याबाबत बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली.

बल्लारपूर पोलिसांनी अज्ञातांवर कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला आहे. 

Leave a Comment

+