Gadchandur News Today : चंद्रपूर - ८ एप्रिलला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गडचांदूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत भोयगाव मार्गावर गोवंश जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेत एकूण ४० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. (शेट्टी गँगचा शेठ, पोलिसांच्या जाळ्यात)
गुन्हे शाखेला अवैध गोवंश जनावरांची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली, माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने सापळा रचत भोयगाव मार्गावर नाकाबंदी केली. यावेळी ट्र्क क्रमांक CG ०४ PQ ७५७९ ला थांबवित त्याची झडती घेतली असता त्यामध्ये ५२ मग जनावरे त्यामध्ये बैल, गाय व गोरे व ३ जनावरे मृत आढळले, सदर जनावरांना अमानुष रित्या कत्तलीकरिता नेण्यात येत होते.
यावेळी ट्र्क चालक सादिक कुरेशी वर प्राण्यांना निर्दयतेने वागणूक प्रतिबंधक कायदा अंतर्गत विविध कलमानव्ये गुन्हा दाखल करीत एकूण ४० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमाक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि दीपक कांक्रेडवार, पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोलीस कर्मचारी स्वामीदास चालेकर, अजय बागेसर, किशोर वैरागडे, प्रमोद डंभारे, गोपीनाथ नरोटे व वृषभ बारसिंगे यांनी केली.
Leave a Comment