Tadoba National Park । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने ताडोबात नवा इतिहास; काय आहे 'झिरोधा'चा प्लॅन?

April 07, 2026 by Prakash Hande

Tadoba National Park News : मुंबई / चंद्रपूर : जैवविविधतेने समृद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन (‘रीवाइल्डिंग’) प्रकल्प राबविण्यासाठी वन विभागाने झिरोधा कंपनी व संवर्धन भागीदार फार्मर्स फॉर फॉरेस्ट या संस्थांबरोबर सामंजस्य करार केला आहेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रोत्साहन आणि पाठबळामुळे हा प्रकल्प साकारणार असून दीर्घकालीन पर्यावरण पुनरुज्जीवन आणि हवामान लवचिकतेसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. (१६३० नागरिकांचा भाजपात प्रवेश, मुनगंटीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास)

 

हा उपक्रम संरक्षित अरण्येसामुदायिक जमीनशेती क्षेत्रगवताळ प्रदेश आणि जलस्रोत अशा विविध भूप्रकारांचा एकत्रित विचार करणारा राज्यातील पहिलाच सर्वसमावेशक लँडस्केप पुनर्संचय प्रकल्प ठरणार आहेप्रत्येक भूप्रकारानुसार शास्त्रीय पद्धतीने आखलेल्या उपाययोजना राबवून परिसंस्थेचे पुनरुज्जीवनजैवविविधतेत वाढ आणि मानव वन्यजीव सहअस्तित्व मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.

 

जैवविविधतेचा महत्त्वाचा केंद्रबिंदू : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात जुना आणि सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प मानला जातोसुमारे 1727 चौ.कि.मीक्षेत्रफळ असलेल्या या प्रकल्पात दक्षिण उष्णकटिबंधीय कोरड्या पानझडी जंगलांचे मुख्य आणि बफर क्षेत्र समाविष्ट आहेयेथे वाघांची संख्या लक्षणीय असून राखीव क्षेत्रात 80 हून अधिक वाघ असल्याचा अंदाज आहेगेल्या दशकात या परिसरात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

 

वाघांव्यतिरिक्त बिबटेरानकुत्रे (ढोले), अस्वलगवाविविध हरिण प्रजातीसाप (यामध्ये संकटग्रस्त भारतीय अजगरआणि 195 हून अधिक पक्षी प्रजाती येथे आढळतातत्यामुळे मध्य भारतातील जैवविविधतेसाठी हा परिसर अत्यंत महत्त्वाचा मानला जातोमात्रवाघसंख्येतील वाढ आणि बफर क्षेत्रातील मानवी वस्ती यामुळे मानव वन्यजीव संघर्षाची समस्या वाढत आहेतसेच विकासामुळे अधिवास तुकड्यात विभागले जाण्याची समस्या निर्माण होत आहेत्यामुळे एकात्मिक आणि समुदायाभिमुख पुनर्संचय उपक्रमांची गरज अधोरेखित झाली आहे. Zerodha Tadoba Partnership

 

प्रकल्पाची वैशिष्ट्ये : या सामंजस्य करारानुसार पुढील उद्दिष्टे साध्य होणार आहेत. 1) राखीव क्षेत्राभोवती 800 एकरांहून अधिक अधोगती झालेल्या जमिनीचे पुनर्संचय. 2) पुनर्संचय उपक्रमसामुदायिक रोपवाटिका आणि पर्यावरणीय देखरेखीद्वारे 15 हजार पेक्षा अधिक ग्रामीण रोजगार दिवसांची निर्मिती. 3) 100 हून अधिक स्थानिक वृक्षझुडुपे व गवत प्रजातींची लागवड आणि संवर्धनज्यामुळे भक्ष्य प्रजाती व इतर वन्यजीवांना अधिवास उपलब्ध होईल.

 

प्रकल्पाची रचना केवळ पारंपरिक वृक्षलागवडीपुरती मर्यादित नसून परिसंस्थेतील नैसर्गिक प्रक्रिया पुनर्संचयित करणेअधिवासांची जटिलता वाढविणे आणि विविध भूप्रकारांमध्ये वन्यजीवांना मुक्तपणे वावरण्यास सक्षम करणेया व्यापक उद्दिष्टांवर आधारित आहेहा उपक्रम वन्यजीवस्थानिक समुदाय आणि हवामान या तिन्ही घटकांना लाभदायी ठरेलविविध भूप्रकारांमध्ये समन्वित काम केल्यास अधिवास ऱ्हासाची कारणे दूर करता येतील आणि भविष्यासाठी लवचिकता निर्माण करता येईलअसे वन विभागाने म्हटले आहे.

Leave a Comment

+