Free SSB Training । चंद्रपूरकरांनो संधी सोडू नका! २७ एप्रिलला जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात मुलाखती

April 07, 2026 by Prakash Hande

Free SSB Training 2026 : चंद्रपूर :  भारतीय सैन्यदलनौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड या परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रनाशिक रोडनाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे ते 13 मे 2026 या कालावधीत कोर्स आयोजित करण्यात येत आहेसदर कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवासभोजनआणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात आली आहे. (अवैध वृक्षतोड, मूल तालुक्यातील सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकांवर कारवाईची मागणी

 

 

तरी चंद्रपूर जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयचंद्रपूर येथे 27 एप्रिल 2026 रोजी मुलाखतीस हजर रहावेइच्छुक उमेदवारांनी www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर किंवा व्हॉट्सॲप क्रमांक 9156073306 या मोबाईल नंबर वर SSB-६५ हा मेसेज केल्यास कोर्ससाठी संबंधित परिशिष्ट व्हॉट्सॲप द्वारे पाठवले जातीलमुलाखतीकरीता प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली प्रिंट सोबत घेऊन यावी.

 

एस.एस.बीकोर्स मध्ये प्रवेश मिळण्यासाठी 1) कम्बाइंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन अथवा नॅशनल डिफेन्स एकॅडमी एक्झामिनेशन पास असावे व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. 2) एन.सी.सीस्पेशल एन्ट्री साठी एस.एस.बीमुलाखतीसाठी कॉललेटर असावे. 3) टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बीमुलाखतीसाठी कॉललेटर असावेयापैकी नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र घेऊन येणे आवश्यक आहेअसे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने कळविले आहे.

Leave a Comment

+