Bandu Dhotre Protest : चंद्रपूर: जिल्ह्यात वाढता मानव-वन्यप्राणी संघर्ष पुन्हा वाढीस लागू नये, वाघाच्या हल्ल्यात होणारे मृत्यू यावर प्रतिबंध यावा यासाठी वाघ मानव संघर्ष निवारण्याच्या प्रलंबित मागण्यासह ताडोबाच्या कॉरिडोर मधे प्रस्तावित लोहारडोंगरी लोह खाण प्रकल्पाची वन्यजीव विषयक परवानगी नाकारण्यात यावी म्हणून आज ५ मार्च पासून इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांचे अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय समोर सुरू झाले आहे. (
RTE च्या नव्या नियमांना उच्च न्यायालयात आव्हान)
चंद्रपूर जिल्ह्यात मागील पाच वर्षात २०० व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे, त्यात मागील वर्षी ४७ मृत्यू तर ब्रम्हपुरी वनविभाग अंतर्गत १८ व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. मानवी जीवितास धोकादायक ठरलेल्या १० वाघांना मागील एका वर्षात जेरबंद करण्यात आले आहे. जिल्ह्यातील वाघ मानव संघर्ष शिगेला पोहचला असताना अत्यंत महत्वाच्या कॉरिडोर मधे खाणीला वन्यजीव विषयक देण्यात आली त्याचा विरोध पर्यावरणवादी संस्थेकडून करण्यात येत आहे.
16 मागण्या
१. चंद्रपूर जिल्ह्यातील व्याघ्र संघर्षावर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकार तर्फे गठीत ११ सदस्यीय तांत्रिक समितीच्या अहवालाची त्वरित अंमलबजावणी व्हावी.
२. चंद्रपूर-मूल रोडवरील ओव्हरपास आणि बामणी-आष्टी रोडवरील अंडरपासच्या कामांना मंजुरी देऊन बांधकाम सुरू करावे.
३. कन्हारगाव व घोडाझरी अभयारण्य वन्यजीव विभागाने ताब्यात घेऊन तेथे कर्मचारी नियुक्ती व गावविकासाची कामे करावीत. घोषित होऊन अनुक्रमे साडे सात व साडे चार वर्षे पासून प्रलंबित.
४. जिल्हा परिषदेमार्फत संवेदनशील गावांना 'बिबट समस्यामुक्त ग्राम योजना’ ला मंजुरी आणि निधी उपलब्ध करून द्यावा.
५. चंद्रपूर जिल्ह्याला अधिकृतपणे 'व्याघ्र जिल्हा' घोषित करून उपाययोजनांत एकसूत्रता आणावी.
६. ताडोबा, कन्हारगाव व घोडाझरी पर्यटनातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा ५०% प्रत्यक्ष लाभ स्थानिक गावांना मिळण्यासाठी धोरण निर्णय घेणे, अभयारण्यालगत स्थानिक लोकांच्या माध्यमातून 'कम्युनिटी रिसॉर्ट/होमस्टे व जिप्सी' चालवण्यास प्रोत्साहन द्यावे.
७. ब्रह्मपुरी वनविभागाचा अभ्यास करून येथील वाघांची वाढती संख्या आणि 'कॅरिंग कॅपॅसिटी'चा अभ्यास करून ग्रामस्थांना भीतीमुक्त वातावरण द्यावे.
८. वनव्याप्त गावांमध्ये पोलीस पाटीलच्या धर्तीवर 'वनपाटील' नियुक्त करावेत.
९. चंद्रपूर येथील प्रस्तावित रेस्क्यू सेंटरचे काम वन्यजीव विभागाकडे हस्तांतरित करून गती द्यावी.
१०. व्याघ्र कॉरिडॉरमधून जाणाऱ्या FDCM वनक्षेत्रातील जंगलतोड बंद करून ते क्षेत्र प्रादेशिक विभागाकडे सोपवावे. वन्यजीव व्यवस्थापन आराखडा मंजूर करावा.
११. वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई प्रक्रिया वन किंवा कृषी अशा एकाच विभागाकडे सोपवावी.
१२.जिल्ह्यातील मानव-वन्यजीव संघर्षाची तीव्रता पाहता 'आपत्कालीन परिस्थिती' घोषित करून आराखडा तयार करावा.
१३. कॉरिडोर मॅपिंग: जिल्ह्यातील वन्यप्राणी भ्रमणमार्गांचे मॅपिंग करून त्यातील अडथळे दूर करावेत.
१४. गोसेखुर्द उजवा कालव्यावर वन्यप्राण्यांच्या ये-जा करण्यासाठी आवश्यक ठिकाणी ओव्हरपास बांधावेत.
१५. संवेदनशील क्षेत्रातील वनरक्षकांना पूर्वीप्रमाणेच मदतनीस पुरवण्याचा निर्णय लागू करावा.
१६. जिल्हयातील प्रादेशिक वनक्षेत्रातील वनव्याप्त गावात पीआरटी ची व्याप्ती व त्यांचे मानधन बाबत वार्षिक तरतूद करणे. Tadoba Tiger Corridor
आज बंडू धोतरे यांचे अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनाच्या पहिल्या दिवशी आंदोलनस्थळी नागरिकांनी भेट देत आपले समर्थन दिले. यात पर्यावरणवादी ग्रीन प्लैनेट संस्थेचे प्रा. सुरेश चोपणे, प्रा. योगेश दुधपचारे, निवृत वनाधिकारी अभय बडकेलवार, किशोर जामदार, कॉ रमेशचंद्र दहिवडे, सार्ड संस्थेचे भाविक येरगुडे, विलास माथनकर, पर्यावरणवाहिनीचे मोहम्मद शरीफ, मुकेश भांडककार, सराफा व्यावसायिक धर्मेंद्र लुणावत, ओमजी वर्मा, डेबूसावली चे सुभाष शिंदे, अब्दुल एजाज, विनोद थेरे, विवेक जिराफे, सुधाकर काकडे, नवनाथ देरकर, भास्कर सपाट, महेंद्र शेरकी, भारती शिंदे, योजना धोतरे, अब्दुल जावेद, राहुल कुचनकर, राजू काहीलकर, सुनील पाटील, अमोल उटटलवार, हरीश मेश्राम, आशिष मंथनवार सुमित कोहळे, नितीन राऊत योगेश पिसे तसेच इको-प्रोचे कार्यकर्ते सहभागी होते.
1 Comments
Manoj Ramchandra Meshram. मानव वन्यजीव संघर्ष वाढतो आहे.यावर योग्य उपाय.सुचवले sir.