चंद्रपुरात वन्यजीव रक्षणासाठी भररस्त्यात 'अर्धनग्न' आंदोलन

March 09, 2026 by Prakash Hande

Bandu Dhotre Protest Chandrapur : चंद्रपूर: जिल्ह्यातील वाढता मानव-वन्यजीव संघर्ष, वाघांच्या हल्ल्यात होणारे मृत्यू आणि ताडोबाच्या महत्त्वपूर्ण वन्यजीव कॉरिडोरला धोका निर्माण करणाऱ्या 'लोहारडोंगरी' खाण प्रकल्पाविरोधात इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाने आज पाचव्या दिवशी प्रवेश केला. या आंदोलनाच्या माध्यमातून शासन आणि प्रशासनाला वन्यजीव रक्षणाप्रती लक्ष वेधण्यासाठी आज आंदोलनस्थळी 'अर्धनग्न आंदोलन' करण्यात आले. (लोहारडोंगरी बाबत संसदेत मांडणार मुद्दा)

 

अर्धनग्न आंदोलन आंदोलन मधे सहभागी, योगेश दुधपचारे, अविनाश पोइनकर, अब्दुल जावेद, अनिल अडगुरवार, आकाश घोडमारे, गौरव कुषमवार, कुणाल देवगीरकर, सुनील पाटील, धर्मेंद्र लुणावत, सुमित कोहळे, सुनील लिपटे, विजय हेडाऊ, सचिन धोतरे, राजू काहिलकर, हरीश मेश्राम, सनी दुर्गे, रुद्राक्ष धोतरे, संदीप इंगोले, किशोर जामदार, आदी सहभागी झाले होते.

 


आज मंडपास भेट देऊन समर्थन/पाठिंबा देणारे संस्था
रोटरी क्लब, चंद्रपूर, जिजाऊ ब्रिगेड, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, सिआयटीयू, संभाजी ब्रिगेड या संस्थासह काल मंडपास भेट देणारे काल खासदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार सुधाकर अडबाले, डॉ अशोक जिवतोडे यांनी भेट देत आपले समर्थन जाहीर केले. मधुसूदन रुंघठा, हिराचंद बोरकुटे, Adv वर्षा जामदार, तर आज जयश्री कापसे, कॉ रमेशचंद्र दहिवडे, अर्चना चौधरी, दिलीप चौधरी, अतुल वासुदेव, डॉ विजय आइंचवार, मनीष बोराडे, राजेश पिंजरकर, लुकेश निमगडे, गंगासागर हेटी, संदीप रामटेके, संतोष तेलंग, निखिल तांबेकर, परशुराम तोडासे आदी प्रमुख व्यक्तीचा समावेश आहे. Lohardongri Mine Project

 

“बंडू धोतरे यांचा उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे, आंदोलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त समर्थन आहे, मात्र शासन प्रशांमसनाचे लक्ष वेधण्याकरिता आज आम्ही ‘अर्धनग्न आंदोलन’ केले.” - अब्दुल जावेद

Leave a Comment

+