भारत नागपाल हत्याकांडातील १२ आरोपींवर मकोका

March 09, 2026 by Prakash Hande

Bharat Nagpal Murder Case : चंद्रपूर - १ मार्चला वरोरा तालुक्यात रेती घाटावर आर्थिक देवाणघेवाणीतून वर्धा जिल्ह्यातील पुलगाव शहर भाजप महामंत्री भारत नागपाल यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी चंद्रपूर पोलिसांनी १२ आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. हे प्रकरण आमदार राजेश बकाने यांनी विधानसभेत गाजविले होते. (१९ वर्षाच्या युवकाच्या हातात पिस्टल, पोलिसांनी केली कारवाई)

 

१ मार्च रोजी वरोरा तालुक्यातील बामर्डा रेती घाटावर आर्थिक देवाणघेवाणीतून मोठा वाद झाला होता. गितेश सातपुते यांनी आपला रेतीघाट वर्धा जिल्ह्यातील ९ जणांना वर्षभरासाठी २ कोटी रुपयांना दिला होता, मात्र कालावधी पूर्ण होण्यापूर्वी सातपुते यांनी घाट परत मागितला, त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील ९ जणांना याचा मोठा आर्थिक फटका बसला होता.

 

कालावधी पूर्ण होण्यापूर्वी घाट परत घेतल्याने उर्वरित ९८ लाख परत करावे अशी मागणी केली सदर मागणीवर सातपुते यांनी २८ फेब्रुवारीला पैसे देतो असे सांगितले मात्र पैसे न दिल्याने पंकज वानखेडेंसह, भारत नागपाल व इतर भागीदारानी वरोरा गाठले, मात्र सातपुते यांनी काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना घाटावर पाठवीत वानखेडे यांच्या सह इतर भागीदारांवर हल्ला केला.

 

तलवार, रॉड व लाकडी दांड्याने वानखेडे, नागपाल यांच्यासह इतरांवर वार करण्यात आले, नागपाल यांच्या डोक्यावर तलवारीने प्रहार केल्यानंतर त्यांना बेदम मारहाण करीत थेट नदीत फेकले, यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. वरोरा पोलिसांनी आरोपीना अटक करण्याची मोहीम राबवली. ८ दिवसात चंद्रपूर पोलिसांनी संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार आरोपी अमोल कामडी, सौरभ ठाकूर, अक्षय खडसे, उदय वांदिले, नितीन कामडी, अजय इरपाचे, प्रकाश कासारे, प्रवीण वासेकर, गितेश सातपुते, प्रफूल उमाटे, सुनील झोरे व अतुल मोटघरे यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई केली.

 

हि कारवाई पोलीस अधीक्षक मुमाक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल, पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के, गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, पोउपनि मनीष तालेवार, अरुण खारकर, सुधीर मत्ते, परवरिष शेख, किशोर बोढे व रुपेश मुल्लेमवार यांनी केली.        

 

Leave a Comment

+