चंद्रपुरात काय चाललंय? ब्रम्हपुरीत दोन अल्पवयीन मुली बेपत्ता, पालकांमध्ये भीतीचे सावट.

March 10, 2026 by Prakash Hande

Bramhapuri Police Station : ब्रम्हपुरी - चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात २ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पालकांनी ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. (भारत नागपाल हत्याकांडातील १२ आरोपींवर मकोका)

 

१६ वर्षीय मुलगी हि एका खासगी कोचिंग सेंटरमध्ये कोचिंग घेते, ७ मार्चला नेहमीप्रमाणे मुलीच्या वडिलांनी तिला दुपारी २ वाजता कोचिंग सेंटरमध्ये सोडले, ती सायंकाळ ६.३० पर्यंत घरी येते, मात्र त्यादिवशी ती घरी आली नाही, याबाबत कोचिंग घेणाऱ्या शिक्षकांशी वडिलांनी संपर्क साधत विचारणा केली असता त्यांनी सांगितले कि तुमची मुलगी क्लास पूर्ण करून निघून गेली.

मुलगी घरी न आल्याने वडिलांनी तिचा नातेवाईक, मित्र मैत्रिणीकडे विचारपूस करीत शोध घेतला मात्र ती कुठेही आढळून आली नसल्याने याबाबत गावातीलच १९ वर्षीय मुलाने फूस लावत तिला पळवून नेल्याची तक्रार ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनमध्ये दिली.

 

दुसऱ्या घटनेत १७ वर्षीय मुलगी वर्ग १२ मध्ये शिकत असून तिचा ९ मार्चला इतिहास विषयाचा पेपर असल्याने ती घरून ११ वाजता निघाली होती, सायंकाळ झाल्यावर सुद्धा ती घरी परतली नाही, त्यामुळे मुलीच्या वडिलांनी महाविद्यालयात जाऊन विचारणा केली, एका मैत्रिणीने सांगितले कि आम्ही दोघीनी जेवण केले नंतर पेपर सुरु झाल्यावर तिच्याबाबत माहिती मिळाली नाही, मात्र सायंकाळी ६ वाजता ती कॉलेजच्या गेटवर उभी असल्याचे एकाने बघितले होते, वडिलांनी शोध घेतला असता मुलीची सायकल महाविद्यालयात मिळून आली.

 

वडिलांनी मुलीच्या इतरत्र शोध घेतला मात्र ती कुठेही आढळून आली नसल्याने याबाबत ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात अज्ञाताने तिला फूस लावत पळविल्याची तक्रार नोंदवली. याबाबत ब्रह्मपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत मुलीचा शोध घेणे सुरु केले.

Leave a Comment

+