BSNL Cable Theft : चंद्रपूर - जीएमटी कार्यालय परिसरात स्टोर करून ठेवलेला लाखो रुपयांच्या केबल तुकड्याची अज्ञातांनी चोरी केल्याचे लक्षात येताच शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्यात अली, पोलिसांनी तपासचक्रे फिरवीत 4 आरोपी सह एकूण 17 लक्ष 27 हजार 614 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. (शिक्षक बनला हैवान, वडिलांची केली हत्या)
बीएसएनएल कार्यालयातील अभिजित जीवने हे 30 जानेवारीला पाहणी करीत असताना जुन्या जीएमटी कार्यालय परिसरात स्टोअर केलेला 280 मीटर लांबीचा केबल किंमत 8 लक्ष 31 हजार 332 रुपये व 186 मीटर लांबीचा केबल किंमत 5 लक्ष 46 हजार 282 असा एकूण 13 लक्ष 77 हजार 614 रुपयांचा केबल अज्ञातांनी चोरून नेला असल्याचे निदर्शनास येताच याबाबत चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासचक्रे फिरवीत आरोपी 35 वर्षीय पयनप्पा रवि शेट्टी, 33 वर्षीय नितीन बाबुराव उरकुडे, 23 वर्षीय ललित रोशन देशभ्रतार, 20 वर्षीय विजयकुमार कार्तिकराम नैताम राहणार सर्व चंद्रपूर यांना अटक करण्यात आली.
आरोपी जवळून कॉपर केबल जाळून त्यातून मिळालेला तांबा असा 13 लक्ष 77 हजार 614 रुपये व गुन्ह्यात वापरलेली चारचाकी वाहन किंमत 3 लक्ष 50 हजार एकूण 17 लक्ष 27 हजार 614 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. BSNL Cable Theft
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वात सपोनि राजेंद्र सोनवणे, पोउपनी दत्तात्रय कोलते, पोउपनी विलास निकोडे, पोलीस कर्मचारी भावना रामटेके, सचिन बोरकर, संजय धोटे, इम्रान शेख, निकेश ढेंगे, जावेद सिद्दीकी, कपूरचंद खरवार, रुपेश पराते, विक्रम मेश्राम, योगेश पिदूरकर, निलेश ढोक, प्रफुल भैसारे, सुशांत घिवे व दीपिका झिंगरे यांनी केली.
Leave a Comment