"चंद्रपुरात अजब चोरी! बीएसएनएलची ४० वर्ष जुनी कॉपर केबल चोरट्यांनी भरदिवसा खोदकाम करून पळवली

February 16, 2026 by Prakash Hande

BSNL cable theft news : चंद्रपूर - टेलिफोन लाइनसाठी टाकलेला बीएसएनएल चा कॉपर केबल ४० वर्षांनी अज्ञातांनी खोदकाम करून चोरून नेला, आधुनिक युगात ऑप्टिक फायबर केबल सध्या मोठ्या प्रमाणात वापरात आहे, मात्र बीएसएनएल चे अधिकारी जुन्या केबलचे नियमित पाहणी करतात, अद्न्यतानी ४० मीटर लांबीचा किंमत एकूण २ लाख रुपये चोरून नेल्याने याबाबतीत रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. (मूल पोलिसांनी पकडला सुगंधित तंबाखू)

 

१५ फेब्रुवारीला बीएसएनएल चे दूरसंचार अधिकारी अभिजित जीवने हे टेलिफोन एक्स्चेंज बिल्डींगमध्ये जाण्यासाठी निघाले असता बस स्थानक समोरील निर्मल हॉटेलजवळ खोदकाम झाल्याचे दिसून आले असता त्याठिकाणी जीवने यांनी पाहणी केली, त्याठिकाणी खोदकाम करीत तब्बल ४० मीटर केबल काढण्यात आला होता. 

 

जीवने यांनी खोदकामाबाबत आजूबाजूला विचारणा केली असता दुकानदारानी सांगितले कि ४ ते ५ लोकांनी खोदकाम करीत केबल काढून नेल्याचे सांगितले, आम्हाला वाटले कि बीएसएनएल किंवा महावितरणचे काही काम सुरु आहे म्हणून आम्ही काही विचारणा केली नाही. 

 

अभिजित जीवने यांनी याबाबत रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देत अज्ञातांनी ४० मीटर केबल एकूण किंमत २ लाख रुपये चोरून नेला. रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे. भर दिवसा झालेल्या या प्रकाराने चांगलीच खळबळ उडाली आहे. 

Leave a Comment

+