Amrut Yojana Fraud : चंद्रपूर - चंद्रपूर महानगरपालिका हद्दीत सुरु असलेली अमृत योजना 2 हि भोंगळ व नियमबाह्य कामाने चर्चेत आली आहे.
या भोंगळ कारभार विरुद्ध युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी आवाज उचलत मनपा आयुक्त यांना निवेदन देत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
शहरात तब्बल 218 कोटी रुपये खर्चून 160 किलोमीटरचे काम करणे सुरु आहे, कामाचा कालावधी पूर्ण झाल्यावर सुद्धा केवळ 60 किलोमीटरचे काम या 2 वर्षात झाले. मनपाने लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनी वर एकमुश्त 20 लाखांचा दंड ठोठावला आहे. (तोंडाला काळे फासून सरकारचा निषेध)
कंपनीवर दंडात्मक कारवाई न करता थेट या नियमबाह्य कामाला जबाबदार अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून विक्रांत सहारे यांनी केली आहे.
सहारे यांनी याप्रकरणी प्रशासनाला निवेदन सह दोनवेळा स्मरणपत्रही दिले, त्यानंतर सुद्धा प्रशासनाने त्यांच्या निवेदनावर दुर्लक्ष केले.
सहारे यांच्या मागण्या काय?
पाईप टाकताना तीन फूट गड्डा करणे अनिवार्य आहे मात्र कंत्राटदाराने फक्त दीड फूट गड्ड्यात पाईप लाईन टाकण्यात आली आहे.
पाईप हि संपूर्ण जमिनीत टाकण्यात येते मात्र कंत्राटदार तर्फे पाईपचे तुकडे टाकण्यात आले ज्यामुळे भविष्यात पाईप लिकेजच्या समस्या उदभवणार.
फेब्रुवारी महिन्यात कंपनीच्या कामाचा कालावधी संपुष्टात आला, अजूनही 50 टक्के काम पूर्ण झाले नाही. विविध ठिकाणी पाण्याच्या 8 टाकीचे काम पूर्ण झाले नाही.
अमृतच्या पाइपलाईनसाठी शहरातील नवे रस्ते फोडण्यात आले, अजूनही ते रस्ते अपूर्णच आहे. Contract Irregularities
विशेष बाब म्हणजे या भोंगळ कारभाराची नियमित पाहणी व चौकशी मनपा व जलप्राधिकरण तर्फे करण्यात आली नाही. हा भोंगळ कारभार बघता मनपा आयुक्त यांनी तात्काळ कारवाई करावी अन्यथा युवासेना या भोंगळ कारभार विरोधात आंदोलन करणार असा इशारा विक्रांत सहारे यांनी दिला आहे.
Leave a Comment