सावधान! चंद्रपूर-मूल मार्गावर लघुशंका करणे पडले महागात; तरुणाने क्षणार्धात गमावली दुचाकी!

February 20, 2026 by Prakash Hande

Chandrapur Bike Theft : चंद्रपूर - चंद्रपूर-मूल मार्गावर लघुशंका करीत असलेल्या युवकाची दुचाकी अज्ञात इसमांनी पळविल्याची घटना ११ फेब्रुवारीला घडली, याबाबत रामनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून अज्ञात आरोपींचा शोध सुरु आहे. (ऑनलाईन चालान चा संदेश आला तर थांबा, आधी खात्री करा अन्यथा)

 

३१ वर्षीय पराग जंपलवार हे इलेकट्रिशिअन म्हणून काम करतात, ११ फेब्रुवारीला पराग हे आपल्या दुचाकी वाहन mh ३४ CB ६९६३ ने मूल मध्ये राहणाऱ्या नातेवाईकांकडे कामानिमित्त भेटण्यास गेले होते. काम झाल्यावर रात्री ८ वाजता ते परत चंद्रपूरच्या दिशेने आले. लोहारा गावापुढे पोहोचल्यावर पराग लघुशंका करण्यासाठी थांबला.

 

गाडीची चावी न काढता पराग लघुशंका करायला उतरला असता त्याचक्षणी दुचाकीवर दोन इसम आले व त्यांनी पराग ची गाडी सुरु करीत चिचपल्ली च्या दिशेने पळ काढला, पराग ने आरडाओरडा केला मात्र ते थांबले नाही. दुचाकी घेऊन ते दोन इसम पळून गेले. पराग ने पोलिसांच्या आपात्कालीन क्रमांकावर संपर्क साधत घडलेल्या घटनेची माहिती दिली.

 

आपली दुचाकी मिळेल या आशेवर आजपर्यंत पराग ने गाव खेड्यात दुचाकींचा शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही, रामनगर पोलीस स्टेशनमध्ये दुचाकी पळविल्याबाबत पराग ने तक्रार दाखल केली असून पोलीस या प्रकरणातील दुचाकी चोरांचा शोध घेत आहे.

Leave a Comment

+