Modus Operandi Theft : चंद्रपूर - मागील काही दिवसापासून चंद्रपुरात दुचाकी वाहनाच्या चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, यामध्ये आता काहीसा पॅटर्न बदललेला आहे, दुचाकी वाहनाने जात असताना जर लघुशंका करण्यासाठी वाहन थांबविले तर काही क्षणार्धात आपली दुचाकी गायब होते. मागील आठवड्यात चंद्रपूर - लोहारा मार्गावर हि अशी दुचाकी चोरीची घटना घडली होती, आता पुन्हा चंद्रपूर शहरात अशी घटना घडल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. (संबंधित बातमी - लघुशंकेसाठी वाहन थांबविले आणि क्षणार्धात दुचाकी गायब)
२० फेब्रुवारीला बादल खांडेकर हा युवक कामावरून इंदिरानगर मध्ये घरी परतत असताना वन अकादमी जवळ त्याने आपली मोपेड दुचाकी वाहन क्रमांक MH ३४CS ५७०६ हि रस्त्याच्या कडेला लावत लघुशंका करण्यासाठी उतरला असता काही वेळात एका युवकाने क्षणार्धात त्याची दुचाकी घेत पळ काढला.
बादल खांडेकर राहणार इंदिरा नगर हा युवक औष्णिक वीज प्रकल्पात खासगी कंपनीत कामाला आहे, २० फेब्रुवारीला कामावरून घरी परतत असताना रात्री ९ वाजेदरम्यान वन अकादमी जवळ पोहोचताच तो रस्त्याच्या कडेला वाहन थांबवित लघुशंकेला उतरला, घाईत वाहनांची चावी लागून राहिली, याचा फायदा उचलत अज्ञाताने क्षणार्धात दुचाकी चोरून नेली. युवकाने दुचाकी इतरत्र शोधली असता वाहन मिळाले नाही.
याबाबत बादल ने दुचाकी चोरीची तक्रार रामनगर पोलीस स्टेशनमध्ये दिली असून पुढील तपास पोलीस करीत आहे, यानिमित्ताने शहरात चोरीच्या घटना आता कधीही व केव्हाही घडू शकतात, अश्या घटना न घडू नये याकरिता आता सर्वानी सावध होणे गरजेचे आहे.
Leave a Comment