चंद्रपूर हादरलं!, जनता कॉलेज चौकात भीषण अपघात

February 18, 2026 by Prakash Hande

Chandrapur Bus Accident : चंद्रपूर - शहरातील जनता कॉलेज चौक येथे बुधवारी रात्री सुमारे साडेआठ वाजण्याच्या सुमारास अत्यंत दुर्दैवी अपघात घडला. (चंद्रपुरात गुन्हेगारांचे राज्य, 20 दिवसात 3 घरफोडी)

 

 मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूरहून नकोडा दिशेने जाणारी राज्य परिवहनची एसटी बस (क्रमांक एमएच-07-सी-9162) जनता कॉलेज चौकातील स्पीड ब्रेकरजवळून जात असताना एका सायकलस्वाराला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की सायकलस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

 

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बस चौकातून पुढे जात असताना सायकलस्वार अचानक बसच्या सपाट्यात आला. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली. स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली.

 

सूचना मिळताच रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आसिफ रजा शेख हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पंचनामा व पुढील तपासाची प्रक्रिया सुरू केली.

 

प्राथमिक माहितीनुसार, मृत व्यक्ती चौकीदार म्हणून कार्यरत होता. मात्र, त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. या दुर्दैवी घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी जनता कॉलेज चौकात योग्य वाहतूक नियंत्रण व सुरक्षिततेची उपाययोजना तातडीने करण्याची मागणी केली आहे.

 

या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

1 Comments

2 months ago

जो पर्यंत शहरातून होणारी जड वाहतूक बंद होणार नाही तो पर्यंत अशा प्रकारे निष्पाप बळी जात राहणारच आहे, यावर जिल्हा प्रशासनाने तोडगा काढने आवश्यक आहे.

Leave a Comment

+