चंद्रपूरकरांचे प्रेम! लाडक्या आमदाराच्या आरोग्यासाठी मंदिरात वेदमंत्रोच्चार आणि महाप्रसादाचे वाटप

February 25, 2026 by Prakash Hande

Chandrapur City Updates : चंद्रपूर -  चंद्रपूर शहराची आराध्य दैवत श्री माता महाकाली मंदिर येथे चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रकृतीत झालेल्या सुधारणा तसेच त्यांना निरोगीदीर्घ व यशस्वी आयुष्य लाभावे यासाठी विशेष महाआरती व महाप्रसाद वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारतीय जनता पक्ष चंद्रपूर महानगर आणि श्री महाकाली माता महोत्सव समीतीच्या वतीने सदर आयोजन करण्यात आले होते. (भाजी हिसकावली म्हणून भावाने केली बहिणीची हत्या)

 

            यावेळी पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि देवीच्या जयघोषात कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्थानिक भजन मंडळांनी सादर केलेल्या देवी स्तुतीअभंग आणि गजरांनी संपूर्ण वातावरण भक्तिरसाने भारावून गेले. जय माता महाकाली च्या घोषणांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.

 

   यानंतर माता महाकालीची विधिवत पूजा-अर्चना करण्यात आली. पुजार्यांनी वेदमंत्रोच्चारात देवीसमोर दीप प्रज्वलित करून आमदार किशोर जोरगेवार यांच्या उत्तम आरोग्यासाठी विशेष प्रार्थना केली. त्यांच्या प्रकृतीत सातत्याने सुधारणा होत राहावीत्यांना दीर्घायुष्य लाभावे आणि ते जनतेची सेवा अधिक जोमाने करू शकावेतअशी मनोभावे प्रार्थना करण्यात आली.

 

             आरतीच्या वेळी मंदिरातील दिव्यांच्या प्रकाशात आणि घंटानादात निर्माण झालेल्या पवित्र वातावरणाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. अनेकांनी आरतीत सहभागी होत आमदारांच्या आरोग्यासोबतच शहराच्या प्रगतीसाठीही प्रार्थना केली. महाआरतीनंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या धार्मिक कार्यक्रमाला विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारीस्थानिक नागरिकमहिला मंडळेयुवा कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.

Leave a Comment

+