Water Supply Alert : चंद्रपूर - चंद्रपूर शहर महानगरपालिका मार्फत रामनगर येथील १५ दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्रावर आवश्यक तांत्रिक दुरुस्ती व देखभाल काम हाती घेण्यात येणार आहे. या कामाच्या पार्श्वभूमीवर पुढील दोन ते तीन दिवस शहरातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा तात्पुरता विस्कळीत होण्याची शक्यता असल्याची माहिती महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत देण्यात आली आहे. (आयुक्त आकनुरी नरेश ऍक्शन मोडमध्ये)
सदर तांत्रिक काम सुरळीत व सुरक्षितरीत्या पार पाडण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्रातील काही यंत्रसामग्रीची दुरुस्ती तसेच आवश्यक देखभाल केली जाणार आहे. या कालावधीत काही भागांमध्ये पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो.
यामुळे नगीना बाग, चोर खिडकी, चपराशी कॉलनी, दादमहल वार्ड, भानापेठ वार्ड, अंचलेश्वर वार्ड, महाकाली वार्ड, भिवापूर वार्ड, बैल बाजार, रामाळा तलाव रोड, बगड खिडकी, जलनगर वार्ड, जटपुरा वार्ड, हॉस्पिटल वार्ड, बाजार वार्ड, एकोरी मंदिर वार्ड, ख्रिश्चन कॉलनी, पंचशील चौक, रामनगर, बोकारे प्लॉट, राष्ट्रवादी नगर, आंबेडकर सभागृह नगर, ठक्कर कॉलनी, सिस्टर कॉलनी तसेच जगन्नाथ बाबा नगर या परिसरांतील पाणीपुरवठ्यावर तात्पुरता परिणाम होण्याची शक्यता आहे.
काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात येईल. दरम्यान नागरिकांनी आवश्यक तेवढ्या प्रमाणात पाण्याचा साठा करून पाण्याचा जपून वापर करावा तसेच महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
Leave a Comment