३ दिवसांचा अल्टिमेटम! राजेश अडूर यांच्याविरुद्ध पक्षशिस्त भंगाची कारवाई होणार?

March 06, 2026 by Prakash Hande

Show Cause Notice : चंद्रपूर - ५ मार्च रोजी चंद्रपूर महानगरपालिकेत स्थायी समिती सदस्यांची निवडप्रक्रिया पार पडली मात्र हि निवडप्रक्रियामध्ये कांग्रेस गटनेता राजेश अडूर यांनी पक्षातर्फे दिलेल्या नावांचा समावेश न करता स्वतःच्या मनमर्जीने नावे दिल्याने कांग्रेस पक्षात अंतर्गत युद्ध सुरु झाले, राजेश अडूर यांची गटनेता व पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी शहर अध्यक्ष संतोष लहामगे यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली होती. लहामगे यांच्या आक्रमक पावित्र्यानंतर अडूर अडचणीत सापडले आहे, पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविले आहे. (स्थायी समिती सदस्य निवडीवरून गोंधळ, कांग्रेस नगरसेवकांचा सभात्याग)

 

कांग्रेस पक्षाच्या अंतर्गत वादात पालिकेची सत्ता गेली, वडेट्टीवार धानोरकर गटाचा वाद शमला अशी चिन्हे होती मात्र आता गटबाजीचा दुसरा पर्व सुरु झाला आहे. स्थायी समितीसाठी १६ सदस्यांची निवड करावयाची होती, कांग्रेसतर्फे ७ सदस्यांची नावे अडूर यांनी दिली होती, नावाची घोषणा होताच कांग्रेसच्या इतर नगरसेवकांनी सभात्याग करीत गटनेत्यावर गंभीर आरोप केले. गटनेत्याने स्वतःच्या मर्जीतील नगरसेवकांना स्थायी समितीमध्ये घेतले.

 

यावर महानगर अध्यक्ष संतोष लहामगे यांनी आक्षेप घेत पक्षातर्फे ३ नावे त्यांना पाठविण्यात आली होती मात्र त्या नगरसेवकांना गटनेत्याने डावलले. अडूर यांची गटनेता व पक्षातून उचलबांगडी करावी अशी मागणीच लहामगे यांनी केल्याने कांग्रेस पक्षात खळबळ उडाली होती. स्थायी समिती सदस्य निवडताना आमदार विजय वडेट्टीवार व खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासोबत चर्चा करणे आवश्यक होते मात्र अडूर यांनी तसे केले नाही. Show Cause Notice

 

महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी या प्रकरणाची दखल घेत अडूर यांना कारणे दाखवा नोटीस पाठवीले. ३ दिवसात लेखी उत्तर सादर करावा अन्यथा आपल्याविरुद्ध पक्षशिस्त भंगाची कारवाई करण्यात येईल.

Leave a Comment

+