काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'कमळ' हाती! वारजूरकरांच्या भाजप प्रवेशाने चंद्रपूरचं राजकारण तापलं

February 26, 2026 by Prakash Hande

Chandrapur Congress Shock : मुंबई/चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात आज कांग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून चिमूर विधानसभा क्षेत्रातील माजी आमदार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व सरपंच यांचा भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश झाला. तत्पूर्वी कांग्रेस पक्षातील वाढती गटबाजी व सामान्य कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष, पक्षाचा वापर धंद्यासाठी असे अनेक आरोप करीत राजीनामा देण्यात आला. हा पक्षप्रवेश चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांच्या मार्गदर्शनात झाला. (पक्षाचा धंदा झालाय, वारजूरकर यांचा राजीनामा

 

माजी आमदार डॉ. अविनाश वारजूरकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश वारजूरकर व शंकरपूर ग्रामपंचायतीचे सरपंच साईश सतीश वारजूरकर यांनी कांग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मुंबईत भाजपात पक्ष प्रवेश केला. सतीश वारजूरकर यांनी दोनदा विधानसभा निवडणूक लढविली आहे, अविनाश वारजूरकर व सतीश वारजूरकर यांनी कांग्रेस पक्षात असताना जिल्हा परिषद, आमदारकी व खनिज प्रतिष्ठान महामंडळाचे अध्यक्ष पद अशी सत्ता उपभोगली होती.

 

सध्या कांग्रेस पक्षात सुरु असलेली गटबाजी व आमदार विजय वडेट्टीवार यांच्या कार्यप्रणालीवर नाराजी दाखवीत वारजूकर बंधूनी कांग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे राजीनामा पाठवीत भाजपात प्रवेश करीत कांग्रेस पक्षाला चांगलाच धक्का दिला. काही महिन्यात चंद्रपूर जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर होऊ शकते या पार्श्वभूमीवर वारजूरकर बंधूंचा प्रवेश या निवडणुकीत भाजपला मोठा मोठा विजय मिळवून देऊ शकतो. 

Leave a Comment

+