मोठे मासे मोकाट, लहान सट्टेबाज पोलिसांच्या जाळ्यात; चंद्रपुरातील सट्टेबाजांचं मोठं नेटवर्क

February 23, 2026 by Prakash Hande

T20 World Cup Betting : चंद्रपूर - दरवर्षी क्रिकेट बुकींचा उत्सव मोठ्या प्रमाणात देशात साजरा करण्यात येतो, तो म्हणजे सट्टेबाजी. चंद्रपुरात असंख्य सट्टेबाज विविध आयडी द्वारे काम करतात. पोलीस मात्र निवडक सट्टेबाजांवर कारवाई करतात मोठे सट्टेबाज निवांत बसत आपला हा व्यवसाय निर्भीडपणे चालवीत आहे. (चंद्रपुरात दारुड्या बापाला मुलाने संपविले)

 

आयपीएल असो कि एकदिवसीय क्रिकेट, टेस्ट, महिला क्रिकेट यावर हजारो कोटींचा सट्टा खेळल्या जातो. चंद्रपूर शहरात अनेक नावाजलेले नाव आहे, जे कोट्यवधी रुपयांची माया जमवून हा धंदा चालवितात. काहींवर कारवाई होते तर काही अर्थपूर्ण ताकद लावत सट्टेबाजी सुरु ठेवतात. सध्या टि२० क्रिकेट वर्ल्ड कपचे सामने सुरु आहे, यावर कोट्यवधी रुपयांचा सट्टा लावल्या जात आहे.

 

चंद्रपूर गुन्हे शाखेने २२ फेब्रुवारी इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका क्रिकेट सामन्यादरम्यान मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने सट्टा घेणाऱ्यांवर धाड मारीत कारवाई केली, या कारवाई एकाला ताब्यात घेण्यात आले असून दोघांची नावे या प्रकरणी पुढे आली आहे. तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हे शाखेच्या कारवाई २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली कि भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका क्रिकेट विश्वकप सामन्यावर ऑनलाईन पद्धतीने रहमतनगर मधील एका खाली प्लॉटमध्ये एक युवक ऑनलाईन पद्धतीने सट्टा घेत आहे, पोलिसांनी तात्काळ ठिकाण गाठत आरोपी ३० वर्षीय सय्यद हरीश उर्फ बिट्टू मुकद्दर अली राहणार रहमतनगर याला ताब्यात घेतले.

 

बिट्टू च्या मोबाईलवर nice७७७७ या आयडीवरून सट्टा घेत असल्याचे निदर्शनास आले, आरोपीला अधिक विचारणा केली असता त्याने हि आयडी हवेली गार्डन मध्ये राहणारा इरफान कुरेशी याच्या मार्फतीने नागपुरातील अफजल शेख कडून तयार केली होती.

 

चंद्रपुरात मागील अनेक वर्षांपासून क्रिकेट सट्टा मोठ्या प्रमाणात खेळल्या जातो यावर कायद्याचे नियंत्रण नसल्याने या धंद्याचे जाळे मोठया प्रमाणात फोफावले आहे. आजपर्यंत सट्टेबाजीच्या कारवाई लहान आरोपीवर कारवाई होते मात्र ज्याने हे जाळं विणलं आहे तो मुख्य आरोपी कधीच पोलिसांच्या हाती लागत नाही हे विशेष. Online Betting Racket

 

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमाक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, दीपक डोंगरे, इम्रान खान, हिरालाल गुप्ता, किशोर वाकाटे शशांक बदामवार यांनी केली.     

 

Leave a Comment

+