Chandrapur District । चंद्रपूर क्राईम डायरी: ९ एप्रिलचा तो दिवस... तीन कुटुंबांची झोप उडाली, पाहा काय घडले.

April 10, 2026 by Prakash Hande

Chandrapur District Alert : चंद्रपूर - जिल्ह्यात अल्पवयीन मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले असून ९ एप्रिल रोजी एकाच दिवशी बल्लारपूर तालुक्यातील २ तर भद्रावती तालुक्यातील एक अल्पवयीन अश्या एकूण ३ मुली बेपत्ता झाल्या आहे. या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (नराधम बापाने पोटच्या मुलीवर केला अत्याचार)

 

९ एप्रिल रोजी बल्लारपूर शहरातील १२ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या मैत्रिणीकडे बुक मागायला गेली मात्र त्यानंतर ती घरी परतलीच नाही, अल्पवयीन मुलगी हि ७ व्या वर्गात शिक्षण घेत असून अभ्यासात तिचे मन लागत नव्हते त्यामुळे पालक तिला नेहमी रागवायचे.

 

गुरुवारी शाळेतून घरी आल्यावर मी मैत्रणीकडे बुक मागायला जाते म्हणून ती घराबाहेर पडली. बराच वेळ झाल्यावर मुलगी घरी न आल्याने मुलीची आई मैत्रिणीच्या घरी पोहोचली. मैत्रीण म्हणाली कि ती घरी आली आणि मला मोबाईल मागितला, ती एका मुलासोबत बोलत होती. मी तिला हटकले असता ती घराकडे जातो असे म्हणत निघाली.

 

पालकांचा संशय बळावला, अज्ञात मुलाने १२ वर्षीय मुलीला फूस लावून पळविल्याची तक्रार बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये पालकांद्वारे देण्यात आली.

दुसऱ्या घटनेत बल्लारपूर तालुक्यात राहणाऱ्या ९ व्या वर्गात शिकणारी १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरी कुणी नसताना बाहेर गेली मात्र ती पुन्हा घरी परतलीच नाही, ९ एप्रिलला आई-वडील बाहेर कामासाठी निघून गेले होते, मोठी मुलगी आपल्या नातेवाईकांकडे गेली, लहान मुलगी घरी एकटी होती. दुपारच्या सुमारास आई घरी आली मात्र मुलगी कुठेहि आढळून आली नाही.

 

आईने इतरत्र शोध घेतला असता अल्पवयीन मुलगी त्यांना आढळली नाही, पालकांनी अज्ञात इसमाने मुलीला फूस लावून पळविले अशी तक्रार बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये दिली. बल्लारपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत मुलीचा शोध सुरु केला आहे.

तिसऱ्या घटनेत भद्रावती तालुक्यात राहणारी १७ वर्षीय मुलगी हि मध्यरात्री कुटुंब झोपेत असताना घराबाहेर पडली. याबाबत कुटुंबाला माहिती मिळाल्यावर त्यांनी भद्रावती पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. १७ वर्षीय मुलगी आपल्या आजी-आजोबांकडे राहत ती शिक्षण घेत आहे. Chandrapur District Alert

 

८ एप्रिल ला रात्री १० वाजता कुटुंबातील व्यक्तींनी जेवण करीत झोपी गेले, ९ एप्रिल ला पहाटे ३ वाजता आजोबा उठले असता त्यांना नातींन आपल्या जागेवर नसल्याचे आढळले, त्यांनी पत्नीला याबाबत माहिती दिली, घराच्या आजूबाजूला व गावात मुलीचा शोध घेतला मात्र ती कुठेही मिळाली नाही.

१७ वर्षीय मुलीला कुणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून पळविले असा संशय बळावल्याने कुटुंबाने याबाबत भद्रावती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात अल्पवयीन मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून पालकांनी मुलीची काळजी घ्यावी.

 

Leave a Comment

+