DJ Dance Fight । धक्कादायक! नाचताना लागला धक्का अन तरुणावर झाला थेट वार

April 11, 2026 by Prakash Hande

DJ Dance Fight : बल्लारपूर - १० एप्रिल रोजी जुनोना गावात लग्नाचा रिसेप्शनचा कार्यक्रम होता, मात्र डीजे च्या तालावर नाचताना काही युवकांमध्ये धक्काबुक्की झाली आणि त्याचे रूपांतर मारहाणीत झाले. याप्रकरणी बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (रामनगर पोलिसांची सट्टा पट्टीवर धाड)

 

जुनोना गावात राहणारा ३२ वर्षीय निखिल उर्फ निलेश अशोक ठाकरे १० एप्रिल रोजी गावातील शिल्पकार नळे याचा रिसेप्शनचा कार्यक्रम बौद्ध विहार जुनोना मध्ये होता. डीजे च्या तालावर नाचताना धक्काबुक्की झाली, बाबुपेठ मधील उद्धव राजरमेश नळे याने निखिल ठाकरे ला मारहाण केली. 

 

निखिल च्या मांडीवर धारदार वस्तूने वार करण्यात आल्याने, निखिल खाली कोसळला, त्यानंतर गावातील नागरिकांनी तात्काळ निखिल ला चंद्रपुरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले. या प्रकरणी निखिलचे मामा विश्वजित लेनगुरे यांनी उद्धव नळे विरोधात बल्लारपूर पोलीस ठाण्यात कलम ११८ (१) अन्वये गुन्हा दाखल केला.

Leave a Comment

+