Free Drinking Water Point : चंद्रपूर - विदर्भात सर्वाधिक तापमान असलेल्या आपल्या चंद्रपूर जिल्हात कडक उन्हाचे चटके जाणवू लागले आणि यासाठी वाटसरुना आवश्यक असतात थंड पिण्याचे पाणी, यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासनारे आणि समाज उपयोगी विविध सामाजिक उपक्रम राबवित असलेले बाबूपेठ महिला बचत गट तसेच रणरागिणी महिला पतसंस्था च्या सौजन्याने महिला बचत गट तसेच रणरागिणी पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्ष सौ चंदाताई वैरागडे यांच्या पुढाकारातून नेताजी चौक बाबूपेठ येथे पाणपोई सुरू करण्यात आली. (चंद्रपुरातील जिल्हाधिकारी पोहोचल्या थेट सामान्य रुग्णालयात)
आज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त पाणपोई चे उद्घाटन चंद्रपूर चे प्रसिद्ध अस्थीरोग तज्ञ डॉ,समीर चेपूरवार,डॉ शर्यू गावंडे वैद्यकीय अधिकारी,डॉ रुपेश ठाकरे,डॉ नक्षीने यांच्या शुभहस्ते,संस्थापक अध्यक्ष सौ.चंदाताई वैरागडे नगरसेविका यांच्या अध्यक्षतेखाली,सोबतच नगरसेविका करिश्मा जंगम प्राचार्य नरेंद्र बोबडे,जितुभाऊ इटनकर,शैलेशभाऊ जुमडे,संजय वैरागडे, नरेंद्रजी इटणकर, गणेश पोहाणे,व रणरागिणी पतसंस्था संचालक मंडळातील सुवर्णा भारस्कर,अपर्णा धकाते,उज्वला कार्लेवार,उषा तंगडपल्लीवार,वैशाली ऐसेकर, संगीता वैरागडे,आणि सुवर्णा मत्ते,प्रिया अगडे,स्नेहा पोतकोंडावार,प्रिया उमाटे,वंदना कामडे,संगीता चिडे,आरती खनके, वर्षा जक्कुलवार,संगीता टवलारकर ज्योती खोब्रागडे तसेच बाबुपेठ प्रभागातील प्रतिष्ठित नागरिक व महिला बचतगटातील बहुसंख्य सदस्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी चंदाताई वैरागडे यांनी महिला बचतगट आणि रणरागिणी पतसंस्थाच्या सौजन्याने दरवर्षी उन्हाळ्यात वाटसरुकरिता पाणपोई लावत असते तसेच विविध समाज उपयोगी उपक्रम राबवित सुद्धा राबवित असते यासाठी सर्व महिलांचे विशेष योगदान लाभत आहे.यावेळी डॉ चेपूरवार यांनी महिलांच्या पुढाकारातून या ठिकाणी दरवर्षी पाणपोई सारखा समाज उपयोगी उपक्रम राबवीत असल्याबद्दल त्यांचे कौतुक करून आम्ही सुद्धा आपल्या बचत गट तर्फे राबवित असलेल्या सामाजिक उपक्रमासाठी आपल्याला सदैव सहकार्य करू असे मौलिक विचार व्यक्त केले.याप्रसंगी डॉ ठाकरे,प्राचार्य बोबडे यांनीही मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन संगीता जवादे तर आभार शुभांगी कंदलवार यांनी मानले.
Leave a Comment