Chandrapur MLA । शब्द टाकला अन् ६० मिनिटात व्हीलचेअर हजर; जोरगेवारांचा सुपरफास्ट निर्णय!

April 10, 2026 by Prakash Hande

Chandrapur MLA Helping Hands : चंद्रपूर - समाजातील गरजू घटकांप्रती संवेदनशीलता आणि तत्परतेचा आदर्श दाखवत आमदार किशोर जोरगेवार यांनी एका वयोवृद्ध दिव्यांग महिलेला तात्काळ मदत करून सामाजिक बांधिलकीची जाणीव पुन्हा निर्माण केली. निर्मला साव या वयोवृद्ध दिव्यांग भगिनीने आपल्या पतीसह आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी व्हीलचेअरची गरज व्यक्त केली. ही बाब लक्षात येताच आमदार जोरगेवार यांनी कोणताही विलंब न करता तत्काळ दखल घेत अवघ्या एका तासाच्या आत त्यांना व्हीलचेअर उपलब्ध करून दिली. (चंद्रपुरात भाजपात पुन्हा शीतयुद्ध सुरु)

 


अचानक मिळालेल्या या मदतीमुळे निर्मला साव यांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधानाचे हास्य आणि कृतज्ञतेचा भाव उपस्थितांना भावूक करून गेले. त्यांच्या दैनंदिन जीवनात ही मदत अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी व्यक्त केले.


यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, समाजातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत मदत पोहोचवणे ही आपली केवळ जबाबदारी नसून, ती समाजाप्रती असलेली बांधिलकी आहे. एखाद्या अडचणीत असलेल्या व्यक्तीच्या मदतीला तात्काळ धावून जाणे हीच खरी जनसेवा असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगातून आमदार जोरगेवार यांच्या कार्यपद्धतीतील संवेदनशीलता आणि तत्परता दाखवली असून असून, समाजातील दुर्बल घटकांसाठी ते नेहमीच पुढाकार घेत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. त्यांच्या या कृतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Leave a Comment

+