Chandrapur MPDA : चंद्रपूर - गुन्हेगारी वृत्तीवर अंकुश लावावं यासाठी चंद्रपूर पोलीस सतत प्रयत्न करीत असते, या अंतर्गत चंद्रपूर पोलिसांनी २२ वर्षीय कुख्यात गुंडांवर एमपीडीए कलम अन्वये १ वर्षासाठी जिल्हा कारागृहात स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. सदर गुंडांवर एकूण ८ गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. (कोरपण्यात वर्गणीच्या नावाखाली खंडणीखोरी)
चंद्रपूर पोलिसांच्या अभिलेखावरील कुख्यात गुन्हेगार २२ वर्षीय राज उत्तम टेकाम राहणार सवारी बंगला, बाबुपेठ यांचेवर वर्ष २०२२ ते २५ या कालावधीत एकूण ८ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. चंद्रपूर शहरासाठी धोकादायक असलेल्या या गुंडाला पोलिसांनी जिल्हा कारागृहात स्थानबद्ध केले.
गंभीर दाखल असलेल्या गुन्ह्यात अश्लील शिवीगाळ करून खुनाचा प्रयत्न, अवैध शस्त्र बाळगणे, हत्यारासह गंभीर दुखापत करणे, धमकावणे, वर्चस्व प्रस्थापित करण्याकरिता हल्ला करणे अश्या गुन्ह्यांचा समावेश आहे. परिसरात राज टेकाम ने चांगलीच दहशत निर्माण केली होती.पोलिसांनी वेळोवेळी कारवाई केल्यावर सुद्धा आरोपी टेकाम हा कायद्याला जुमानत नव्हता.
गुन्हेगारी वृत्तीला चपराक बसावी याकरिता चंद्रपूर पोलिसांनी राज टेकाम वर महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक, गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती दृकश्राव्य, कलाकृती विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती, वाळू तस्कर अत्यावश्यक वस्तूचा काळाबाजार करणारी व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना प्रतिबंध करण्याविषयीचा अधिनियम सण १९८१ अन्वये प्रस्ताव तयार करून जिल्हादंडाधिकारी विनय गौडा यांच्याकडे सादर करण्यात आला.
जिल्हाधिकारी गौडा यांनी सदर प्रस्तावाची दखल घेत राज उत्तम टेकाम याला १ वर्षाकरिता मध्यवर्ती कारागृह चंद्रपुरात स्थानबद्ध करावे असा आदेश पारित करण्यात आला. पोलिसांनी १६ फेब्रुवारीला राज टेकाम ला अटक करीत कारागृहात स्थानबद्ध केले. Chandrapur MPDA
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमाक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले, गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, तसेच पोलीस निरीक्षक शहर निशिकांत रामटेके, महिला पोलीस सारिका गौरकार, सपोनि योगेश खरसाण, पोलीस कर्मचारी अरुण खारकर, सुधीर मत्ते व परवरिष शेख यांनी केली.
Leave a Comment