Chandrapur Police : चंद्रपूर - होळी व धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर वाहतूक नियंत्रण शाखा व पोलीस दलाने अतिउत्साही नागरिक, मद्यप्राशन करीत भरधाव वेगाने वाहन चालविणाऱ्यांवर विशेष मोहीम राबवित कारवाई केली. या काळात २६८ जणांवर ड्रंक अँड ड्राइव्ह ची कारवाई करण्यात आली. (चंद्रपूर मनपा कांग्रेस गटनेत्याची हकालपट्टी करा - संतोष लहामगे)
१ मार्च ते ३ मार्च दरम्यान पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात पोलीस दलाने विशेष मोहीम राबवली, या मोहिमेअंतर्गत दुचाकी/चारचाकी वाहने भरधाव वेगाने व बेदरकारपणे चालवीत रॅश ड्राइव्हिंग, स्टंटबाजी सारखे कृत्य करीत नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात आली.
चंद्रपूर जिल्ह्यात २६८ चालकांवर ड्रंक अँड ड्राइव्ह ची कारवाई करण्यात आली. तसेच या कालावधीत वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे ५९ तर पोलीस स्टेशन स्तरावर २६८ ट्रिपल सीट वाहन चालविणाऱ्यावर कारवाई करण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या नागरिकांवर कारवाई संदर्भात चिंता व्यक्त केली, नागरिकांनी नियमांचे पालन करावे दारू पिऊन चालक स्वतः व दुसऱ्या नागरिकांचा जीव धोक्यात टाकतात, त्यामुळे पोलिसांच्या कारवाईची वाट न बघता नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन मुमक्का सुदर्शन यांनी केले आहे.
Leave a Comment