चंद्रपुरात 'भाई' बनण्याची हौस नडली!, भररस्त्यात दहशत माजवणाऱ्या इसमाचा पोलिसांनी केला गेम!

March 08, 2026 by Prakash Hande

Chandrapur Weapon Seizure Case : बल्लारपूर/वरोरा (चंद्रपूर) - जिल्ह्यतील अनेक नवतरुण मुले भाई बनण्याच्या मार्गावर असून आपली दहशत रहावी याकरिता स्टंटबाजी तर कधी धारदार शस्त्र सोबत घेत हुल्लडबाजी करण्याच्या प्रयत्नात असतात, अश्याच काही शस्त्रधारी नवतरुणांवर बल्लारपूर व वरोरा पोलिसांनी कारवाई करीत २ युवकांकडून धारदार तलवार जप्त केली. (फुटपाथवर झोपलेल्या महिलेसोबत नराधमाचे नीच कृत्य)

 

 

बल्लारपूर शहरातील झाशी राणी चौकात एक युवक आपल्याहातात लोखंडी तलवार सोबत घेत परिसरात दहशत निर्माण करीत असल्याची माहिती बल्लारपूर पोलिसांना मिळाली. पोलीस आपल्या चमूसह झाशी राणी चौकात पोहोचले. पोलिसांनी त्या युवकाभोवती घेराव टाकत त्याला ताब्यात घेतले.

 

युवकाचे नाव २६ वर्षीय पवन चंदर बाणोत राहणार विवेकानंद वॉर्ड असे होते, युवकांकडून लोखंडी पात्याला गंज लागून असलेली ७७ सेंटीमीटर लांबीची तलवार किंमत ३०० रुपये जप्त करण्यात आली. आरोपी युवकावर भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ अन्वये गुन्हे दाखल करीत अटक करण्यात आली.

 

 

वरोरा शहरातील भिवदरे लॉन समोरील रस्त्यावर एक इसम हातात तलवार घेऊन फिरवीत होता, त्याच्या या वागण्यामुळे नागरिकांना इजा होण्याची शक्यता होती, याबाबत वरोरा पोलिसांना माहिती मिळाल्यावर त्यांनी तात्काळ चमूसह पोहचत त्या इसमाला ताब्यात घेतले. तलवार फिरविणाऱ्या इसमाचे नाव ३५ वर्षीय रंजित कालूराम कटारे राहणार पचेखेडी भंडारा हल्ली मुक्काम कर्मवीर वॉर्ड वरोरा आहे.

आरोपी कटारे जवळून पोलिसांनी ८५ सेंटीमीटर लांबीची धारदार तलवार किंमत १ हजार रुपये जप्त केली, आरोपीवर भारतीय हत्यार अधिनियम कलम ४, २५ अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

 

Leave a Comment

+