चंद्रपूर हादरले! वर्धा आणि वैनगंगा नदीत ३ तरुण बुडाले; आनंदाच्या होळीवर दु:खाचं सावट!

March 01, 2026 by Prakash Hande

Youth Drowned Today : चंद्रपूर - होळीच्या पूर्वसंध्येला चंद्रपूर जिल्ह्यात तीन युवक नदीत बुडाल्याची घटना घडली असून यामध्ये एक युवक मित्राला वाचविण्यासाठी तर दुसऱ्या घटनेत २ युवक अंघोळ करताना बुडाले, अद्यापही युवकांचा थांगपत्ता लागलेला नसून पोलीस बचाव दल त्यांचा शोध घेत आहे. पहिल्या घटनेत चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी मध्ये वर्धा नदी पात्राजवळ मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सहा मित्र गेले होते, वाढदिवस साजरा केल्यावर युवक नदीत उतरले, त्यापैकी ज्याचा वाढदिवस होता तो युवक खोल पाण्यात बुडू लागल्याने २२ वर्षीय विजय प्रेमनाथ यादव ने मित्राला वाचविण्यासाठी नदीत उडी मारली. (चंद्रपुरात २४ तासांच्या आत बाळ चोरणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद)

 

पाण्याचा खोल अंदाज न आल्याने विजय स्वतः नदीत बुडाला, मित्रांनी मदतीसाठी पोलिसांना फोन लावला, पोलीस दल व बचाव पथकांने विजयची शोधमोहीम सुरु केली मात्र अद्यापही त्याचा पत्ता लागला नाही, विजय यादव हा पोलीस भरतीची तयारी करीत होता, दुसऱ्या घटनेत ब्रम्हपुरी मध्ये पार्टीसाठी मित्रांसोबत नदीपात्राच्या पलीकडे जाऊन वैनगंगा नदीपात्रात आंघोळ करणारे दोन युवक वाहून गेल्याची घटना १ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली आहे.

 


यामध्ये वाहुन गेलेल्या युवकांचे नाव शुभम विजय सहारे वय १९ वर्ष, शुभम पुष्पराज बगमारे वय २४ वर्ष दोन्ही रा.खरकाडा ता.ब्रम्हपुरी असे आहे.
प्राप्त माहितीनुसार ब्रम्हपूरी तालुका मुख्यालयापासुन सुमारे १६ किमी अंतरावर असलेल्या खरकाडा या गावातील ७ ते ८ युवक हे आज दि. १ मार्च रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास पार्टी करण्यासाठी म्हणून गावानजीक असलेल्या वैनगंगा नदीच्या काठावर गेले. Youth Drowned Today

 

त्यानंतर काही जणांनी आपण नदीच्या पात्राच्या पलीकडे जाऊन पार्टी करू म्हणून बेत आखला. त्यानंतर हे सर्व युवक नदीपात्र ओलांडून कोंढाळा च्या बाजूला गेले. सर्वांची जेवण आटोपल्यावर यातील काही जण नदीपात्रात आंघोळ करत होते. तेव्हा शुभम बगमारे व शुभम सहारे हे युवक सुध्दा नदीपात्रात आंघोळ करायला लागले. तेव्हा पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही युवक वाहुन गेले आहेत. सध्या बुडालेल्या युवकांचा शोध घेणे सुरु असून अद्यापही दोघांचा पत्ता लागला नाही.

 

Leave a Comment

+