Tiger Safari Project । चंद्रपूरच्या नकाशावर येणार जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र; जोरगेवारांचा दिल्लीपासून नागपूरपर्यंत पाठपुरावा

April 09, 2026 by Prakash Hande

Chandrapur Tiger Safari Project : चंद्रपूर - चंद्रपूरच्या मूल रोडवरील वन अकादमीजवळ प्रस्तावित असलेल्या महत्त्वाकांक्षी टायगर सफारी प्रकल्पाला गती मिळावी यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू ठेवला असूनयाच अनुषंगाने त्यांनी आज गुरुवारी नागपूर येथील वन भवन येथे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)महाराष्ट्र राज्य,राज्याचे श्रीनिवास रेड्डी व वनबल प्रमुख  एम. एस. राव, यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. (जिल्हाधिकारी पंत यांनी घेतली गॅस गोदामांची झडती)

 

या भेटीत टायगर सफारी व रेस्क्यू सेंटर प्रकल्पाची सद्यस्थितीआवश्यक प्रशासकीय प्रक्रिया तसेच प्रकल्पाला लवकर मान्यता मिळण्यासाठी आवश्यक असलेले टप्पे यावर सखोल चर्चा करण्यात आली. आमदार जोरगेवार यांनी या प्रकल्पाचे चंद्रपूर जिल्ह्यासाठी असलेले महत्त्व लक्षात आणून देत त्यास तातडीने गती देण्याची मागणी केली.

 

दरम्यानअर्थसंकल्पीय अधिवेशनातही आमदार जोरगेवार यांनी हा मुद्दा प्रभावीपणे मांडत सभागृहाचे लक्ष वेधले होते. यावर उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी टायगर सफारीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला असून त्याचा पाठपुरावा सुरू असल्याचे स्पष्ट केले. तसेच लवकरच या प्रकल्पाला मान्यता मिळेलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

चंद्रपूर टायगर सफारी आणि रेस्क्यू सेंटर प्रकल्पासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू असूनयापूर्वीही त्यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा विषय मांडला होता. त्यावेळी वनमंत्र्यांनीही प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद देत निधी वितरण प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते.

 

याशिवाय आमदार जोरगेवार यांनी नागपूर येथील गोरेवाडा प्राणी संग्रहालयाची पाहणी करून प्रकल्पाच्या आराखड्याचा अभ्यास केला होता. तसेच दिल्ली येथील केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या कार्यालयातही या संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती.

सुमारे ६०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असलेल्या या प्रकल्पासाठी एफडीसीएम गोरेवाडा झू लिमिटेड या संस्थेकडे सविस्तर आराखडा तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दरम्यानआमदार किशोर जोरगेवार यांनी नागपूर येथील वन भवन येथे झालेल्या या बैठकीत प्रकल्पाच्या मंजुरीसंदर्भातील विविध प्रशासकीय टप्प्यांवर चर्चा करताना सध्या केंद्र व राज्यस्तरावर प्रलंबित असलेल्या बाबींचा आढावा घेतला. प्रकल्पासाठी आवश्यक असलेली कागदपत्रेतांत्रिक मान्यतापर्यावरणीय परवानग्या तसेच केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाची अंतिम मंजुरी मिळविण्याबाबतही सखोल चर्चा करण्यात आली.

 

यावेळी प्रकल्पाच्या आराखड्याची अंमलबजावणीनिधी वितरणाची प्रक्रिया तसेच कामांना गती देण्यासाठी आवश्यक असलेले प्रशासकीय निर्णय यावरही विचारविनिमय झाला. संबंधित विभागांमधील समन्वय अधिक प्रभावी करण्यासाठी कोणती पावले उचलावीतयाबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यावर होणाऱ्या विलंबाच्या कारणांचा आढावा घेऊन त्यावर उपाययोजना करण्याबाबतही सकारात्मक चर्चा यावेळी झाली.

 

यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी या प्रकल्पाचे चंद्रपूर जिल्ह्यासाठी असलेले बहुआयामी महत्त्व स्पष्ट केले. हा प्रकल्प केवळ पर्यटनवाढीसाठीच नव्हेतर वन्यजीव संवर्धनमानव-वन्यजीव संघर्ष कमी करणे आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. चंद्रपूर जिल्हा हा वाघांच्या उपस्थितीसाठी ओळखला जात असूनवाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत रेस्क्यू सेंटर उभारणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. Chandrapur Tourism Expansion

 

तसेच टायगर सफारीमुळे जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळेलस्थानिक व्यवसायांना गती मिळेल आणि राज्याच्या नकाशावर चंद्रपूर एक महत्त्वाचे पर्यटन केंद्र म्हणून उदयास येईलअसा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रकल्पाला तातडीने गती देण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्याततसेच संबंधित विभागांनी समन्वय साधून कार्यवाही करावीअशी ठाम मागणी आमदार जोरगेवार यांनी यावेळी केली.

Leave a Comment

+