"मी निर्दोष आहे..." ६१ हजारांच्या फसवणुकीच्या आरोपावर प्रज्ञा पाटील यांचा खुलासा

March 13, 2026 by Prakash Hande

Travel Fraud : चंद्रपूर - पॅकेज टूर च्या नावाखाली चंद्रपुरातील महिलेने न्यायाधीशासह अधिकाऱ्यांना गंडविले, याबाबत रामनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे, मात्र फिर्यादी सहारे यांनी आरोप केलेल्या महिलेने त्यांचे आरोप फेटाळून लावले आहे. (व्हाट्सअप वरील अनोळखी ग्रुप वर विश्वास, साडेचार लाखांची फसवणूक)

 

चंद्रपुरातील साची टुरिझम च्या संचालिका प्रज्ञा पाटील यांच्यावर नागपूर कोषागार मध्ये कार्यरत सहायक लेखा अधिकारी निलेश सहारे यांनी फसवणुकीचा आरोप करीत गुन्हा दाखल केला असून याबाबत रामनगर पोलीस पुढील तपास करीत आहे. या सर्व प्रकरणावर प्रज्ञा पाटील यांनी आपली प्रतिक्रिया देत सहारे यांचे आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे.

 

साची टूर्स अँड ट्रॅव्हल्स च्या संचालिका प्रज्ञा पाटील ह्या मागील १६ वर्षांपासून टूर अँड ट्रॅव्हल्स चा व्यवसाय करीत आहे, त्यांनी आतापर्यंत अनेक पर्यटकांना प्रामाणिकपणे सेवा दिल्या आहे, २५ डिसेम्बर २०२५ रोजी नागपुरातील निलेश सहारे यांना आपल्या न्यायाधीश मित्रांसह नागपूर ते हैद्राबाद अशी सहलीची योजना आखली होती.

 

त्यासाठी त्यांनी चंद्रपुरातील साची टूर्स च्या संचालिका प्रज्ञा पाटील यांना पॅकेज बाबत विचारणा केली, तर त्यावर १९ प्रवाश्यांचे १ लाख २० हजार रुपयांचा पॅकेज ठरला, पॅकेज चे ५० टक्के रक्कम आधीच जमा करावी असे सांगितले. त्यावर सहारे यांनी होकार दर्शवित पाटील यांना ठरल्याप्रमाणे ६१ हजारांचे ऑनलाईन द्वारे पेमेंट केले, मात्र ऐनवेळी सहारे यांनी वाहन पाठविले नाही. व आम्ही त्यांना दिलेले ६१ हजार रुपये परत केले नाही असा आरोप करीत सहारे यांनी पाटील यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

 

या सर्व प्रकरणावर पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली कि, आम्ही ग्राहकांना पॅकेज टूर देताना त्यांना प्रवासात कसलाही त्रास होता कामा नये असे उत्तम नियोजन केल्यावरच त्यांना पॅकेज देतो, मात्र त्यासाठी पैसे पूर्ण द्यावे लागतात, कारण ग्राहकांच्या पैश्यावर त्यांच्या पॅकेजचे पेमेंट केले जाते.  Package Tour

 

या प्रकरणात मला पूर्ण पैसे मिळाले नाही, मी त्यांना अनेकदा विनवणी केली कि पॅकेजचे पेमेंट करा, कारण डिसेम्बर महिन्यात प्रवासी मोठया प्रमाणात प्रवास करतात, त्यामुळे आमच्या ग्राहकांना वेळेवर हॉटेल व फिरण्याचे नियोजन करण्यासाठी आगाऊ किंवा पूर्ण पेमेंट आवश्यक असते, आम्ही सहारे यांच्याकडून पॅकेज कन्फर्म साठी ५० टक्के व जाण्याच्या १० दिवसआधी ५० टक्के रक्कम जमा करावी लागणार असे सांगितले होते, मात्र ते पैसे देण्यासाठी तयार नव्हते, आधी सर्व्हिस बघू नंतर पेमेंट करू असे ते बोलत होते. सिजनच्या काळात इतर टूर सुरु असल्यामुळे पूर्ण पेमेंट केल्याशिवाय सेवा करणे शक्य नव्ह्ये, त्यामुळे या प्रकरणात गैरसमज निर्माण झाला. आमचं काम हे विश्वासावर चालते, ग्राहकांचा प्रवास सुलभ व्हावा याकरिता आम्ही उत्तम नियोजित पॅकेज त्यांना तयार करून देतो. १६ वर्षांपासून आम्ही हे विश्वासाचे काम करीत आहोत, त्यामध्ये कुणाचीही फसवणूक करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. विशेष बाब म्हणजे ज्यावेळी पैसे देण्यासाठी मी कॉल करायची त्यावेळी सहारे यांनी अनेकदा अर्वाच्य भाषेचा वापर केला होता. 

 

सहारे यांनी जी तक्रार दिली आहे त्या संबंधित माझ्याकडे सर्व व्यवहाराचे पुरावे सुद्धा आहे, मी पोलिसांना तपासात पूर्ण सहकार्य करेल, यावर कायदेशीररित्या उत्तर द्यायला मी तयार आहे. शेवटी सत्य समोर येईल.

   

Leave a Comment

+