"औषधं आणायला जातो" सांगून निघाला, पण काळाने वाटेतच गाठलं! चिमूर-नेरी मार्गावर युवकाचा करुण अंत

February 21, 2026 by Prakash Hande

Chimur Road Accident : चिमूर : नेरी मार्गावर दुचाकी व ट्रॅव्हलर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन युवक जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. (लाच घेताना अटक, मात्र एसीबीची माहिती देण्यास टाळाटाळ)

 

हितेश कचरुजी गुरुनुले (वय २७) व आशिष मन्सराम श्रीरामे (वय २९) हे दोघेही खुटाळा येथील रहिवासी असून औषधे आणण्यासाठी नेरीकडे जात असताना नेरीकडून भरधाव वेगात येणाऱ्या MH40 AK 7898 क्रमांकाच्या ट्रॅव्हलरने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले.

 

अपघातानंतर जखमींना तातडीने चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे. नागपूर येथे हितेश गुरुनुले याचा मृत्यू झाली असल्याची माहिती मिळाली आहे.

 

दरम्यान, संबंधित ट्रॅव्हलर व दुचाकी वाहन चिमूर पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आली असून ट्रॅव्हलर चालक अमोल गिरडे (रा. नेरी) यांना पंचनामा व पुढील चौकशीसाठी पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले आहे. पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहेत.

Leave a Comment

+