"कढोली ते हडस्ती... नदीकाठच्या गावांचा नकाशा बदलणार? इरई नदीच्या पूररेषेबाबत महत्त्वाची अपडेट

February 13, 2026 by Prakash Hande

Erai River Flood Line : चंद्रपूर - इरई नदीलगत चंद्रपूर परिसरातील कढोलीचिंचोलीवढोलीपायलीकिटाळीमिनगांवचांदसुर्लालोहनविचोडाअंबोराविचोडी बु., नेरीपडोलीलखमापूरवडगांवचांदा रैकोसरारहमत नगरबालाजी वार्डनगिनाबागसिस्टर कॉलोनीजगन्नाथ बाबा नगरचंद्रपूरदाताळादेवाडाबोररिठआरवटचारवटनांदगाव पोडेहडस्ती या गावांमध्ये पुरबाधित क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणीचे काम चंद्रपूर पाटबंधारे विभागचंद्रपूर या विभागामार्फत ते 7 डिसेंबर 2025 या कालावधीत स्थानिक नागरिकांशी संवाद साधून व पुरस्थितीबाबत प्रत्यक्ष माहिती गोळा करण्यात आली. (चंद्रपुरातील पाण्याची समस्या सुटणार, महापौर ऍक्शन मोडमध्ये)

 

इरई नदीच्या पुरपरिस्थितीबाबत गोळा करण्यात आलेल्या माहिती व पिवळी पूररेषा आखणीबाबत नागरिकांना कोणत्याही सुचना अथवा प्रत्यक्ष जागेसंबंधी माहिती द्यावयाची असल्यास 20 फेब्रुवारी  ते मार्च 2026 पर्यंत उपविभागीय अधिकारीपाटबंधारे उपविभाग (सिंचन), सिव्हील लाईनचंद्रपूर या कार्यालयात अर्ज विहीत नमुन्यात माहिती भरून सादर करावा.

 

नागरिकांनी सहकार्य करून वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध करून द्यावीअसे चंद्रपूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जलेश सिंह यांनी कळविले आहे.

Leave a Comment

+