रत्लामचा तरुण, चंद्रपुरात फ्लॅट आणि ९१ लाखांच्या बनावट नोटा; थरारक गुन्हेगारी समोर!

March 11, 2026 by Prakash Hande

Fake Currency Seized : चंद्रपूर - देशभरात सोशल मीडियाच्या माध्यमातून बनावट नोटांची विक्री ऑनलाईन पद्धतीने केली जाते, २० लाखांच्या नोटा ५ लाखात, १० लाखांच्या नोटा ३ लाखात, असं हे नेटवर्क ऑनलाईन माध्यमांचा वापर करून सुरु आहे. असाच एक साम्य प्रकार चंद्रपुरातील ऊर्जानगर भागात सुरु होता, मात्र त्या नोटा बाजारात येण्यापूर्वीचा प्रयत्न गुन्हे शाखेने हाणून पाडला, प्रिंटरच्या साहायाने नकली नोटा बाजारात विकण्यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेने एकाला अटक करीत ९१ लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या. (ब्रह्मपुरीत २ अल्पवयीन मुली बेपत्ता)

 

चंद्रपुरातील ऊर्जानगर मेजर गेटजवळ गुन्हे शाखेला एका व्यक्तीबाबत गोपनीय माहिती मिळाली, माहितीच्या आधारे पोलीस पथक राजश्री अपार्टमेंट फ्लॅट क्रमांक २०३ मध्ये पोहोचले, मात्र त्याठिकाणी कुलूप असल्याने पोलिसांनी फ्लॅट धारकाला बोलावीत त्यांच्यासमोर कुलुप तोडले व आत प्रवेश केला.

 

आत प्रवेश केल्यावर त्याठिकाणी १० खरड्याचे बॉक्स आढळून आले, त्या बॉक्स मध्ये ५०० रुपयांच्या नोटा होत्या, या नोटा भारतीय चलनाच्या हुबेहूब दिसणाऱ्या असल्याने पोलिसांनी ते बॉक्स जप्त केले. पोलिसांनी फ्लॅट मध्ये राहणाऱ्या भाडेकरूची माहिती फ्लॅट धारकांकडून घेतली त्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने २६ वर्षीय शुभम दिनेश नागर राहणार पंचेड, तालुका रतलाम मध्यप्रदेश ताब्यात घेतले. आरोपी मागील महिनाभरापासून चंद्रपुरात राहत होता.

 

पोलिसांनी या कारवाईत ९१ लाखांच्या ५०० रुपयांच्या नोटा व एक कलर प्रिंटर असा एकूण ९१ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीवर कलम ३१८ (२), ३१८ (३), ३३६ (२), ३३६ (३) व १८२ (१) अन्वये गुन्हा दाखल करीत आरोपीला न्यायालयात हजर केले असता आरोपीला २ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आरोपीने सदर बनावट नोटा मार्केट मध्ये विकल्या कि बाहेर राज्यात विकणार याबाबत दुर्गापूर पोलीस तपास करीत आहे. Local Crime Branch

 

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमाक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक गौरव कायंदे पाटील, गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, सपोनि दिलीप कांक्रेडवार, सपोनि बलराम झाडोकर, पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोउपनि सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी सचिन गुरनुले, संतोष येलपुलवार, गणेश मोहुर्ले, नितीन रायपुरे, रजनीकांत पुठ्ठावार, किशोर वाकाटे, अजित शेंडे, दिनेश अराडे, प्रमोद डंभारे, निराशा तितरे, विजयमाला वाघमारे, छाया निकोडे, अपर्णा मानकर, दीपिका सोडणार व उषा लेडांगे यांनी केली.               

Leave a Comment

+