Gambling Den Raid : भद्रावती (चंद्रपूर) : स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे मुरसा (ता. भद्रावती) येथील जंगल परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून सुमारे 4 लाख 69 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (चंद्रपुरातील फार्म हाऊसवर सुरु होता जुगार, एलसीबीची धाड)
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुरसा जंगल परिसरात काही इसम जुगार खेळत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून छापा टाकण्यात आला. घटनास्थळावरून जुगार खेळताना चार जणांना ताब्यात घेण्यात आले.
52 तास पत्ते (किंमत 50 रुपये)
डावावरील व आरोपींच्या अंगझडतीतील रोख रक्कम 29,400 रुपये
6 मोटारसायकली
3 मोबाईल फोन
एकूण किंमत : 4,69,450 रुपये
या प्रकरणी भद्रावती पोलीस स्टेशन येथे अप.क्र. 385/26 अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12(अ) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शुभम रमेश कारेकार (वय 30, रा. किलोणी)
विनोद वासुदेव सेलोटे (वय 45, रा. पडोली)
संजय पांडुरंग सोनेकर (वय 32, रा. शेणगाव)
शुभाष मारोती गानफाडे (वय 40, रा. मुरसा)
प्रमोद उर्फ काली (रा. घोडपेठ, ता. भद्रावती)
दादु बोबडे (रा. शेणगाव, घुग्घूस)
इतर चार आरोपींचा शोध सुरू
ही कारवाई उपविभाग वरोरा पथक व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांच्या संयुक्त पथकाने केली. फरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास भद्रावती पोलीस करत आहेत. LCB Chandrapur Action
स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून बेकायदेशीर जुगार अड्ड्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Leave a Comment