सावधान! गडचिरोलीतून तेलंगणात चालला होता मृत्यूचा प्रवास; ४६ मुक्या जीवांना गोंडपिपरी पोलिसांनी दिलं जीवदान

February 21, 2026 by Prakash Hande

Animal Trafficking Bust : गोंडपिपरी  (जि. चंद्रपूर): गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मौजा वढोली येथे केलेल्या नाकाबंदी दरम्यान गडचिरोलीहून तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी अवैधरित्या नेण्यात येत असलेल्या 46 गोवंशीय गाय व बैलांची सुटका केली. या कारवाईत 5 पिकअप वाहने जप्त करण्यात आली असून एकूण 50 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. (चंद्रपूर शहरातील नामांकित शाळेतील शिक्षकाने तब्बल ६ विद्यार्थिनीसोबत केले अश्लील चाळे)

 

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे 6.30 वाजता संशयित पिकअप वाहने वढोलीकडे येताना दिसली. समोरील वाहनास थांबण्याचा इशारा केल्यानंतर चालकाने वाहन उभे केले. चौकशीदरम्यान चालकाने आपले नाव मोहसीन आयुब खान (वय 40, रा. वाकडी, जि. आसिफाबाद) व सोबत असलेला इसम मोहम्मद मंजूर अली (वय 42, रा. माजीदवाडा, ता. वाकडी, जि. आसिफाबाद, तेलंगणा) असे सांगितले.

 

दरम्यान, मागून येणाऱ्या अन्य चार पिकअप वाहनचालकांनी समोर पोलीस असल्याचे लक्षात येताच वाहने वळवून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काळ पाठलाग केला असता वढोली नदीच्या पुलाजवळ त्यांनी वाहने सोडून शेतशिवारात पसार झाले. शोधमोहीम राबवूनही ते हाती लागले नाहीत.

 

जप्त करण्यात आलेल्या 5 पिकअप वाहनांमधून एकूण 46 गोवंशीय जनावरे (अंदाजे किंमत 9 लाख 20 हजार रुपये) व 5 वाहने (अंदाजे किंमत 41 लाख रुपये) असा एकूण 50 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे. संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. Gondpipri Police Action

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी (मूल) सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांच्या नेतृत्वात पार पडली. या पथकात पोलीस हवालदार विलास कोवे, वंदिराम पाल, अनुप कवठेकर तसेच पोलीस कर्मचारी अतुल तोडासे, तिरुपती गोडसेलवार, प्रवीण कडूकर, प्रशांत नैताम, सुनील गव्हारे, चालक पुनेश्वर कुळमेथे, मनिषा ठाकरे, सैनिक रियाज शेख व प्रशांत गुडपल्ले यांचा सहभाग होता.

 

पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या अवैध वाहतुकीबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

Leave a Comment

+