एक रात्र घर राहिलं बंद अन् चोरांनी कपाटातील सोनं-नाणं केलं लंपास; गोंडपिपरीतील 'या' भागात खळबळ

February 21, 2026 by Prakash Hande

Gondpipri Theft News : गोंडपिपरी (चंद्रपूर) - सांस्कृतिक कार्यक्रम बघण्याकरिता गावी गेलेल्या दिवसे कुटुंबाच्या घरी अज्ञाताने प्रवेश करीत सोन्याचे दागिने व रोख असा एकूण १ लाख १३ हजार रुपयांची चोरी केली. चोरी झाल्याची घटना दुसऱ्या दिवशी २० फेब्रुवारीला दिवसे कुटुंब घरी परतल्यावर उघडकीस आली. (चंद्रपुरातील फार्महाऊसमध्ये रंगला जुगार, लाखोंचा मुद्देमाल जप्त)

 

गोंडपिपरी शहरातील कुणबी समाज भवनच्या समोर संत तुकाराम नगरात राहणारे ३८ वर्षीय शेतकरी अतुल दिवसे हे १९ फेब्रुवारीला आपल्या मूळ गाव भनारहेटी गावात सांस्कृतिक कार्यक्रम बघण्यासाठी कुटुंबासह गेले होते. दुसऱ्या दिवशी २० फेब्रुवारीला दिवसे कुटुंब घरी आले असता मुख्य दाराचे कुलूप लावलेले नव्हते, अतुल दिवसे आत गेले असता घरातील सामान पूर्णतः अस्तव्यस्त स्थितीमध्ये होते. 

 

बेडरूम मधील कपाट उघडे होते, त्या कपाटात दिवसे कुटुंबाचे सोन्याचे दागिने, ५० हजार रुपये रोख असा एकूण १ लाख १३ हजार ५०४ रुपयांचा मुद्देमाल अज्ञाताने लंपास केला, याबाबत तात्काळ दिवसे यांनी गोंडपिपरी पोलिसात फिर्याद नोंदवली. दिवसे यांच्या घरासह शेजाऱ्याचे घर सुद्धा फोडण्याचा प्रयत्न केला होता.

 

दिवसे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३३१ (४) व ३०५ अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

Leave a Comment

+