चंद्रपूरच्या खासदाराची आंतरराष्ट्रीय स्तरावर भरारी! भारत-उझबेकिस्तान मैत्री गटात प्रतिभा धानोरकरांची वर्णी

March 02, 2026 by Prakash Hande
India Uzbekistan Relations : चंद्रपूर :  खासदार प्रतिभा धानोरकर यांची 'भारत-उझबेकिस्तान संसदीय मैत्री गटा'च्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. १८ व्या लोकसभेच्या कार्यकाळासाठी ही नियुक्ती करण्यात आली असून, लोकसभेच्या माननीय अध्यक्षांच्या सूचनेनुसार ही निवड जाहीर झाली आहे. (५ मार्चपासून बंडू धोतरे यांचे बेमुदत अन्नत्याग सत्याग्रह)
 
 
 
लोकसभा सचिवालयाकडून (परिषद आणि शिष्टाचार शाखा) यासंदर्भातील अधिकृत पत्र खासदार प्रतिभा धानोरकर यांना प्राप्त झाले आहे. भारत आणि उझबेकिस्तान या दोन्ही देशांमधील संसदीय सहकार्य व आंतरराष्ट्रीय संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. हा या मैत्री गटाचा मुख्य उद्देश आहे.
 
 
 
या महत्त्वाच्या निवडीबद्दल खासदार प्रतिभा धानोरकर यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची आणि दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबूत करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला असून, कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी, कॉंग्रेस नेत्यां खासदार प्रियंका गांधी, यांचे त्यांनी आभार मानले.

Leave a Comment

+