तक्रारींचा पाढा आणि जिल्हाधिकाऱ्यांचा ऑन-द-स्पॉट निकाल; बल्लारपुरात नेमकं काय घडलं?

February 24, 2026 by Prakash Hande

Janta Darbar Chandrapur : चंद्रपूर : नागरिकांच्या तक्रारींचे स्थानिक स्तरावर निराकरण व्हावेत्यांच्या समस्या यंत्रणेने जाणून घेऊनत्या जागच्या जागी सोडविण्यासाठी कार्यवाही करावीयासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्या अध्यक्षतेखाली बल्लारपूर उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे जनता दरबारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यावर त्वरीत कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले. (चंद्रपुरातील हजारो कुटुंबाना मिळणार घर, मुनगंटीवार यांचा पाठपुरावा)

 

जनता दरबारमध्ये प्रॉपर्टी कार्ड मिळणेअतिक्रमण नियमानुकुल करणेबळजबरीने केलेले अतिक्रमण मोकळे करणेमृत्यू प्रमाणपत्र मिळवून देणेजमीन विषयक बाबीऑनलाईन ७/१२मालमत्ता गहाळ केल्याबाबतमालकी हक्क पट्टे देणेमोजणीफेरफाररस्ता मंजूर करणे अशी एकूण ५० निवेदने स्वीकारण्यात आली.

 

आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्री गौडा म्हणालेमंत्री खासदार व आमदार यांच्याकडून आलेले संदर्भशासकीय कार्यालयाने नियमानुसार त्वरित कारवाई करून निकाली काढावे. धोरणात्मक बाबी असेल तर त्वरित वरिष्ठांना कळवावे. 'आपले सरकार सेवा केंद्रमधील तक्रारी निकाली काढाव्यात. पक्के व कच्चे घरांचे प्रस्ताव त्वरित पाठवावे. छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत पुढील तीन महिन्यात तालुकास्तरावर शिबिर घेण्यात येणार आहे. सर्व लाभार्थ्यांना या शिबिरात लाभ द्यावा.

 

यापुढे ऍग्रीस्टॅक नोंदणी असेल तरच शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढण्यासाठी त्वरित नोंदणी करावी. ई- पिक पाहणी करताना जेवढे क्षेत्र आहे  तेवढेच क्षेत्र पेरामध्ये येणे आवश्यक आहे.  ग्रामपंचायत स्तरावरच सर्व दाखले मिळतीलयाबाबत नियोजन करावे. घरकुल मंजूर झाले मात्र अद्यापही बांधकाम सुरू झाले नाहीअशा प्रकरणांचा आढावा घ्यावाअशा सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या. Janta Darbar Chandrapur

 

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना शिरसागरबल्लारपूरचे उपविभागीय अधिकारी अर्जुन पावरातहसीलदार रेणुका कोकाटेप्रकल्प संचालक मंजिरी टकलेउपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायगुडेजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारेगटविकास अधिकारी धनंजय साळवेन. प. मुख्याधिकारी विशाल वाघ आदी उपस्थित होते.

 

या विषयांचा झाला आढावा : लोकप्रतिनिधींच्या आलेल्या संदर्भावर त्वरित कार्यवाही करणेशासकीय जमिनीवरील अतिक्रमणसर्वांसाठी घरेमहाराजस्व अभियानपांदण रस्तेअर्धन्यायिक प्रकरणेवर्ग 2 मधून  1 मध्ये जमीन वर्ग करणेशेतकऱ्यांची ऍग्रीस्टॅक नोंदणीई - पीक पाहणीविशेष अर्थसहाय्य योजनाझुडपी जंगलई - ऑफिस प्रणालीमुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानजलयुक्त शिवारजलजीवन मिशनलखपती दिदीआयुष्यमान कार्ड वाटपमातृवंदन योजनालेक लाडकीनवीन अंगणवाडी बांधकाम आदी विषयाचा आढावा घेण्यात आला.

Leave a Comment

+