Kisan Nagarkar National Award : चंद्रपूर - भारतीय केंद्रीय विद्युत प्राधिकरण, टाटा पॉवर दिल्ली डिस्ट्रिब्युशन लिमिटेड तसेच विविध वितरण, जनरेशन व ट्रान्समिशन कंपन्यांच्या सहकार्याने दि. ७ मार्च २०२६ रोजी नवी दिल्ली येथील द स्टीन ऑडिटोरियम, इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे "लाईनमन डे"च्या सहाव्या आवृत्तीचे आयोजन मोठ्या थाटात पार पडले. (भाईगिरी बनण्याची हौस, चंद्रपूर पोलिसांनी माज उतरविला)
या कार्यक्रमात देशभरातील लाईनमन, टेक्निशियन व वीज क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या निस्वार्थ सेवेचा गौरव करण्यात आला. याच कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्यातील श्री. किसन दामोधर नागरकर यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत राष्ट्रीय स्तरावरील ‘बेस्ट टेक्निशियन’ पुरस्काराने केंद्रीय विद्युत मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
वीज क्षेत्रात अनेक वर्षे प्रामाणिकपणे व धाडसीपणे सेवा देत असलेल्या श्री. नागरकर यांच्या कार्याचे यापूर्वीही कौतुक झाले आहे. यापूर्वी त्यांना महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण मंडळाकडून ‘विश्वकर्मा गुणवंत कामगार’ पुरस्कार मिळाला आहे.
किसन नागरकर यांच्या सन्मानाबद्दल नाते आपुलकीचे बहु. संस्थेचे अध्यक्ष संतोष ताजने, सचिव प्रा. प्रमोद उरकुडे, सल्लागार उमेश पारखी, सदस्य किशोर तुराणकर, राजेश पहापळे, मनोहर डवरे, महेश गुंजेकर, गणेश पाचभाई, हितेश गोहोकार व समस्त मित्र परिवार (विदर्भ) यांनी अभिनंदन केले आहे.
Leave a Comment