Kishor Jorgewar Health : चंद्रपूर - चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, डॉक्टरांनी तात्काळ तपासणी केली असता त्यांच्या रक्तनलिकेत १ ब्लॉकेज आढळले, डॉक्टरांनी वेळेवर उपचार सुरु करीत दोन्ही ब्लॉकेज काढण्यात आले, सध्या आमदार जोरगेवार यांची प्रकृती स्थिर आहे. (चंद्रपुरात १२ फुटी अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार - आमदार जोरगेवार)
चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे भाजप पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार हे शिव जयंती निमित्त कार्यक्रमात व्यस्त असताना अचानक त्यांच्या छातीत जळजळ व्हायला लागली, त्यांच्या सह असलेल्या भाजप पदाधिकारी यांनी तात्काळ जोरगेवारांना सीएचएल रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी अँजिओग्राफी केल्यावर त्यांच्या शरीरात हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या एका नलिकेत ब्लॉकेज आढळले. यावेळी डॉक्टरांनी त्वरित उपचार करीत त्यांच्या शरीरातील ब्लॉकेज यशस्वीरीत्या सुरळीत केले.
आमदार किशोर जोरगेवार यांची प्रकृती सध्या स्थिर असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घ्यायला सांगितले आहे. विधान मंडळातील सहकारी आमदार यांची प्रकृती खालावल्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारणा केली.
Leave a Comment