Knife Attack : चंद्रपूर - लग्नाच्या वरातीमध्ये नाचण्यावरून वाद झाला, वाद इतका टोकाला गेला कि चाकूने एकावर हल्ला करीत जखमी केले, रामनगर पोलिसांनी या प्रकरणात तिघांवर गुन्हे दाखल केले. ३१ वर्षीय विजय मनमोहन दास हे या हल्ल्यात जखमी झाले. सध्या ते रुग्णालयात उपचार घेत आहे. (चंद्रपुरात अभियंत्याचे घर लुटले)
६ फेब्रुवारीला कागजनगर मधील ईजगाव मध्ये राहणारे ३१ वर्षीय विजय मनमोहन दास हे वरातीसोबत लग्न कार्यक्रमात आले होते, वराती मध्ये नाचत असताना काही मुलांसोबत वाद झाला, वाद इतका टोकाला पोहोचला कि एकाने चाकू काढत आज तुला जीवानिशी ठार करतो असे म्हणत चाकूने हल्ला केला. अचानक झालेला हल्ला वाचविताना चाकू विजयच्या हातावर लागला.
इतर दोघांनी विजय दास ला हात बुक्क्याने मारहाण केली, यावेळी माहिती मिळताच जखमी चे भाऊ संजय दास यांनी विजय ला रुग्णालयात नेले, संजय दास यांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार नोंदवली असून या प्रकरणी बिशाल बिस्वास, शुभम ठाकरे व सुजय मंडळ राहणार शाम नगर यांच्याविरोधात पोलिसांनी कलम १०९ व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Leave a Comment