Korpana extortion : कोरपना - शांततेसाठी प्रसिद्ध असलेल्या कोरपना शहरात सध्या एका टोळीने उच्छाद मांडला आहे. 'कार्यक्रमाच्या' नावाखाली व्यापाऱ्यांच्या गळ्याला नख लावून खंडणी उकळणे आणि पैसे न दिल्यास सरळ तोडफोड करून दहशत निर्माण करणे, हा या भामट्यांचा नित्यक्रम झाला आहे. या टोळीच्या हैदोसामुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली असून, आता या खंडणी बहादरांच्या मुसक्या आवळण्याची वेळ आली आहे. (चंद्रपुरात खळबळ, ४० वर्षांनी तो केबल अज्ञातांनी चोरला)
कार्यक्रमाचा बनाव अन् खंडणीचा डाव!
गेल्या काही दिवसांपासून कोरपना शहरात सार्वजनिक कार्यक्रमांचे निमित्त साधून ही टोळी सक्रिय झाली आहे. "आम्हाला अमुक कार्यक्रमासाठी एवढी वर्गणी हवी," असा सज्जड दम भरला जातो. मात्र, ही वर्गणी नसून ती सरळ-सरळ खंडणी असल्याचे समोर येत आहे. ज्या व्यापाऱ्यांनी या टोळीच्या बेकायदेशीर मागणीला झुगारून लावले, त्यांच्या मालमत्तेची तोडफोड करण्यात आली. या गुंडगिरीमुळे सामान्य जनतेत भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न हे भामटे करत आहेत.
बांबू तट्टे विकणारा झाला 'राजकीय' खंडणीखोर!
या टोळीतील एका म्होरक्याची पार्श्वभूमी अत्यंत संशयास्पद आहे. एकेकाळी जंगलातील बांबूचे तट्टे विकून उदरनिर्वाह करणारा हा इसम आज अचानक 'राजकीय आश्रया'खाली उड्या मारत आहे. वनविभागाच्या डोळ्यात धूळ फेकून, कोणताही शासकीय वाहतूक परवाना (TP) न घेता जंगलातील मौल्यवान बांबूची अवैध तोड आणि तस्करी करण्यात याचा मोठा हात असल्याचे बोलले जात आहे. स्वतःला राजकीय नेता म्हणवून घेणारा हा भामटा प्रत्यक्षात शासकीय संपत्तीची लूट करून स्वतःची पोळी भाजत आहे.
रेती तस्करीचे जाळे आणि 'अभय-पवन'चा हैदोस!
शहरात चर्चेत असलेले दुसरे नाव म्हणजे 'अभय'. रेती तस्करीच्या अवैध धंद्यात याने आपले जाळे इतके घट्ट विणले आहे की, महसूल विभागालाही त्याने जुमानणे सोडले आहे. बेकायदेशीर रेती उपसा करून स्वतःच्या मालकीचे 'हायवा' आणि 'ट्रॅक्टर' रस्त्यावर उतरवणारा हा इसम नेमका कोणाच्या बळावर ही मग्रुरी करत आहे? असा प्रश्न जनता विचारत आहे. पवन आणि अभय या जोडगोळीने शहरात अक्षरशः धुमाकूळ घातला असून, पैशासाठी कोणत्याही पातळीवर जाण्याची त्यांची तयारी असते.
सूत्रांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, या टोळीच्या म्होरक्याविरुद्ध आणि त्यांच्या अवैध धंद्यांविरुद्ध ठोस पुराव्यांसह एक मोठी फाईल तयार करण्यात आली आहे. लवकरच हे शिष्टमंडळ पोलीस अधीक्षक (SP) यांची भेट घेऊन या खंडणीखोरांच्या मुसक्या आवळण्याची मागणी करणार आहे. "जोपर्यंत या भामट्यांना तुरुंगाची हवा दाखवली जात नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार स्वतः अवैध क्षेत्रात राहून, रेती तस्करी आणि बांबू चोरी करून माजलेल्या या टोळीला आता कायद्याचा 'तडाखेबाज बँड' ऐकू येणार आहे. राजकीय संरक्षण मिळाले म्हणजे गुन्हा करण्याचा परवाना मिळाला, असे समजणाऱ्या या भामट्यांचे दिवस आता भरले आहेत!
Leave a Comment