चंद्रपुरातील उद्योजकांसाठी सुवर्णसंधी! जिल्हा स्तरावर होणार मोठा सन्मान

February 17, 2026 by Prakash Hande

Laghu Udyog Award : चंद्रपूर - राज्यातील लघुउद्योग घटकांच्या उत्पादनाचा दर्जा उंचावावा व स्पर्धात्मक वातावरण निर्मितीस चालना मिळावीया उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालयांतर्गत जिल्हा उद्योग केंद्रचंद्रपूर यांच्या वतीने उत्कृष्ट लघुउद्योग जिल्हा पुरस्कार योजना राबविण्यात येत आहे. सन 2023-242024-25 व 2025-26 या वर्षांसाठी पात्र उद्योग घटकांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. (वयाच्या साठीनंतर मिळवा दरमहा ३ हजार रुपये पेन्शन)

 

स्थायी लघुउद्योग नोंदणीकृत किंवा उद्यम नोंदणीकृत व मागील दोन वर्षांपासून सलग उत्पादनात असलेले लघुउद्योग घटक या पुरस्कारासाठी पात्र राहतील. संबंधित उद्योग घटक वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा. तसेच महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासनाचा पुरस्कार पूर्वी प्राप्त झालेला नसावा आणि याआधी जिल्हा पुरस्कार योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

 

उद्योग घटक कोणत्याही एका विशिष्ट वर्षासाठीच पात्र राहील. अर्जासोबत फोटोसह विहित नमुन्यातील अर्जउद्यम नोंदणी प्रमाणपत्रकर्ज खाते नियमित असल्याबाबत संबंधित बँकेचे पत्रमागील तीन वर्षांचे लेखापरीक्षित ताळेबंद व नफा-तोटा पत्रकमागील तीन वर्षांचे उत्पादन विवरणपत्रजात प्रमाणपत्र (उपलब्ध असल्यास)तसेच प्रदर्शन सहभाग प्रमाणपत्र किंवा अधिकृत पत्र (उपलब्ध असल्यास) जोडणे आवश्यक आहे.

 

सदर योजनेअंतर्गत निवड झालेल्या उद्योग घटकांना अनुक्रमे  15 हजार रुपये10 हजार रुपये रोख रक्कमसन्मानचिन्हप्रशस्तिपत्रशाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात येणार आहे.

पात्र उद्योग घटकांनी आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यातील अर्ज दि. 24 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत जिल्हा उद्योग केंद्रउद्योग भवनतळ मजलाबस स्टँड जवळचंद्रपूर येथे सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त होणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

 

अर्जाचा नमुना www.di.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्रचंद्रपूर येथे संपर्क साधावाअसे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे.

Leave a Comment

+