Latest News । २०० युनिट फ्रीच्या नावावर जनतेची फसवणूक? चंद्रपूरच्या आमदारावर सरकारचे गंभीर आरोप!

April 10, 2026 by Prakash Hande

Latest News Chandrapur: चंद्रपूर - चंद्रपूरच्या राजकारणात आज राष्ट्रीय पक्ष गटबाजीत विखुरले आहे, कांग्रेस पक्षात वडेट्टीवार विरुद्ध धानोरकर तर भाजपात मुनगंटीवार विरुद्ध जोरगेवार असा प्रखर टीकेचा सामना सुरु आहे. भाजप सारख्या शिस्तबद्ध पक्षात आजही अंतर्गत कलह सुरु आहे. चंद्रपूर मनपा निवडणुकीत अनेकांची तिकिटे कापण्यात आली, त्याचा थेट आरोप चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार जोरगेवार यांच्यावर करण्यात आला. यादरम्यान भाजप महानगर अध्यक्ष याना पदावरून पायउतार व्हावे लागले.  (चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी थेट गॅस गोदामात)

 

मनपा निवडणुकीनंतर सिजफायर झालेल्या दोन्ही नेत्यात भाजप स्थापना दिनापासून नवा वाद उफाळला आहे. भाजपचे जेष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रात भाजप स्थापना दिनाचा कार्यक्रम न घेता चंद्रपुरातील गांधी चौकात आयोजित केला. या दिवशी भाजपचे दोन स्थापना दिनाचे कार्यक्रम घेण्यात आले. जोरगेवार यांचा कार्यक्रम भाजपच्या नव्या महानगर कार्यालयात घेण्यात आला. गांधी चौकात झालेल्या कार्यक्रमात आमदार मुनगंटीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत तब्बल १६३० नागरिकांनी भाजपात प्रवेश केला. (माजी नगरसेवक अजय सरकारचा टीकेचा व्हिडीओ बघा)

 

या पक्षप्रवेश कार्यक्रम नंतर आमदार जोरगेवार यांनी टीका करीत भाजप पक्षात प्रवेश करतेवेळी नव्या सदस्यांची यादी तयार करण्यात येते, मात्र त्या कार्यक्रमात अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रवेश देण्यात आला हि गंभीर बाब आहे, जोरगेवार यांनी अप्रत्यक्षपणे माजी नगरसेवक अजय सरकार यांना टोला लगावला होता. सरकार यांनी जोरगेवार यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. जोरगेवार यांच्यावर टीका करताना अजय सरकार यांची जीभ मात्र घसरली.

 

२०० युनिट च्या नावावर जनतेला मूर्ख बनविण्यात आले, जोरगेवार आता निवडणुकीत उभे राहिले तर त्यांना ३० हजार मते सुद्धा पडणार नाही. ते जनतेचे आमदार नाही, दुसऱ्याची गुन्हेगारी काढली मात्र तुमच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल आहे, ते कागदपत्रे जनतेसमोर आली तर तुमचं काय होणार? मनपा निवडणुकीपूर्वी सरकार यांनी आमदार जोरगेवार यांचा अनेकदा विरोध केला होता. त्यामुळे सरकार यांना मनपा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागली होती. Mungantiwar vs Jorgewar

 

पण मुनगंटीवार यांनी भाजप स्थापना दिनाच्या कार्यक्रमात मनपा निवडणुकीत भाजप पक्षाविरुद्ध लढलेले उमेदवार यांना पुन्हा भाजपात प्रवेश देण्याची घोषणा केली. मुनगंटीवार यावेळी म्हणाले होते कि लढणारे उमेदवार पक्ष सोडून गेले नव्हते, एबी फार्म चोरी झाले आणि त्यांना निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने रागाच्या भरात निवडणूक लढवली. ते आपल्या परिवाराचे सदस्य आहे त्यांची पुन्हा घरवापसी झाली आहे.

भाजप पक्षात मुनगंटीवार-जोरगेवार हे एकमेकांच्या विरोधात उघडपणे बोलताना दिसतात त्यामुळे पक्षात दुफळी निर्माण झाली आहे. येणाऱ्या काळात हि दुफळी एकत्र येणार कि नाही अशी शक्यता सध्या तरी दिसत नाही आहे. सध्यातरी मुनगंटीवार यांनी विखुरलेल्या भाजप सदस्यांना एकत्र करण्याचे काम केले तर एकत्र असलेले कार्यकर्ते जोरगेवार यांनी विखरून टाकले अशी चर्चा आता चंद्रपूरच्या राजकारणात रंगली आहे.

Leave a Comment

+