यंदाची महाशिवरात्र असणार खास! आमदार किशोर जोरगेवारांचे भाविकांसाठी मोठे नियोजन

February 14, 2026 by Prakash Hande

maha shivratri Chandrapur : चंद्रपूर - महाशिवरात्री निमित्त महाराष्ट्रातील सर्वात विशाल महाशिवलिंग स्थळी आयोजित करण्यात येणार्या भव्य धार्मिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांनी आज कार्यक्रमस्थळी भेट देत सुरू असलेल्या तयारीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी मनपा अधिकारीवेकोली प्रशासनातील अधिकारी आणि मंदिर कमेटीच्या सदस्यांची उपस्थिती होती. (चंद्रपुरात राजकीय विरोधकांचे व्हॅलेंटाईन)

 

    या कार्यक्रमासाठी विविध समित्यांमार्फत अंतिम तयारी सुरू आहे. यावेळी आमदार जोरगेवार यांनी मंडप उभारणीदर्शन रांग व्यवस्थावाहतूक नियोजनपार्किंग सुविधापिण्याचे पाणीस्वच्छता व्यवस्थाप्रकाशयोजना तसेच सुरक्षा व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला.

 

  १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळपासून रुद्राभिषेक पूजामहाआरतीशिव-पार्वती विवाह सोहळाभजन संध्या व प्रसाद वितरण असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार असून १६ फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने कोणतीही गैरसोय होऊ नयेयासाठी सर्व तयारी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

 

     बाहेरगावाहून येणार्या भाविकांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देणेवाहतूक कोंडी टाळण्यासाठी योग्य नियोजन करणे तसेच सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही त्रुटी राहू नयेयाबाबत संबंधितांना सूचनाही देण्यात आल्या. कार्यक्रम भक्तिभावानेशिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व पदाधिकारीकार्यकर्ते व स्वयंसेवकांनी समन्वयाने काम करावेअसे आवाहन आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांनी यावेळी केले.

Leave a Comment

+