अखेर मुहूर्त लागला! भाजपची नवी जंबो कार्यकारिणी जाहीर; पाहा कुणाला मिळाली संधी?

February 24, 2026 by Prakash Hande

Maharashtra BJP List : मुंबई - भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मंगळवारी पक्षाच्या नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. 12 उपाध्यक्ष6 सरचिटणीस,12 चिटणीस, कोषाध्यक्षसह कोषाध्यक्षमुख्य प्रवक्ताविविध मोर्चाच्या अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती श्री. चव्हाण यांनी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडेप्रदेश मुख्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरेमाध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. जुन्या आणि नव्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची पदाधिकारी म्हणून नियुक्ती  करण्यात आल्याचे श्री. चव्हाण म्हणाले. (मुलांनी मैदान मारलं तर मुलींनी गाजवलं, राज्यस्तरीय क्रिकेट सामन्यात चंद्रपूरचा डंका)

 

पंतप्रधान नरेंद्र मोदीकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीतसेच राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीनकेंद्रीय संघटन मंत्री बी. एल.संतोषसह संघटन मंत्री शिवप्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रमुख नेते यांच्याशी चर्चा केल्यानंतर या कार्यकारिणीची घोषणा केल्याचे श्री. चव्हाण यांनी नमूद केले.

 

यावेळीश्री. चव्हाण म्हणाले की पाठोपाठ लागलेल्या निवडणुकांच्या आचार संहितेमुळे कार्यकारिणीची घोषणा लांबणीवर पडली होती. निवडणुकांची धामधूम संपल्यानंतर भाजपाला बळकटी देऊन भाजपाची विचारधारा तळागाळात पोहोचवण्यासाठी नव्या कार्यकारिणीची गरज लक्षात घेऊन घोषणा करण्यात आली आहे. Ravindra Chavan BJP

 

प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकरभारती पवारसंजय कोडगेसंजय भेंडेरामदास तडसकेशव उपाध्येप्रवीण पोटे, गोपीचंद पडळकरचैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदेसुजय विखे पाटीलअर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

प्रदेश सरचिटणीस म्हणून आ.निरंजन डावखरेआ.योगेश सागरआ. संजय कुटेमाधवी नाईकराजेश पांडेसुनील राणे या सहा जणांची  नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य प्रवक्ते म्हणून नवनाथ बन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

  • नवीन पदाधिकारी
  • अतुल काळसेकर उपाध्यक्ष कोकण विभाग 
  • भारती पवार उपाध्यक्षा उत्तर महाराष्ट्र
  • संजय कौडगे उपाध्यक्ष मराठवाडा 
  • संजय भेंडे उपाध्यक्ष विदर्भ 
  • रामदास तडस उपाध्यक्ष विदर्भ 
  • केशव उपाध्ये उपाध्यक्ष मुंबई 
  • प्रवीण पोटे उपाध्यक्ष विदर्भ 
  • गोपीचंद पडळकर उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र 
  • चैतन्यबापू देशमुख उपाध्यक्ष मराठवाडा 
  • प्रिया शिंदे उपाध्यक्षा पश्चिम महाराष्ट्र 
  • सुजय विखे उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र
  • अर्चना पाटील चाकूरकर उपाध्यक्षा मराठवाडा 
  • निरंजन डावखरे सरचिटणीस कोकण 
  • योगेश सागर सरचिटणीस मुंबई 
  • संजय कुटे सरचिटणीस विदर्भ 
  • माधवी नाईक सरचिटणीस कोकण 
  • राजेश पांडे सरचिटणीस पश्चिम महाराष्ट्र 
  • सुनील राणे सरचिटणीस मुंबई 
  • प्रशांत ठाकूर चिटणीस कोकण 
  • मंगेश चव्हाण चिटणीस उत्तर महाराष्ट्र 
  • परिणय फुके चिटणीस विदर्भ 
  • वर्षा डहाळे चिटणीस पश्चिम महाराष्ट्र 
  • संतोष जनाटे चिटणीस कोकण 
  • संजय जगताप चिटणीस पश्चिम महाराष्ट्र 
  • अर्चना डेहनकर चिटणीस विदर्भ 
  • रोहिणी नायडू चिटणीस उत्तर महाराष्ट्र 
  • राम सातपुते चिटणीस पश्चिम महाराष्ट्र 
  • प्रवीण घुगे चिटणीस मराठवाडा 
  • रेखा कुलकर्णी चिटणीस मराठवाडा 
  • भैरवी वाघ चिटणीस उत्तर महाराष्ट्र 
  • मिहीर कोटेचा कोषाध्यक्ष मुंबई 
  • अरुण लखानी सह कोषाध्यक्ष विदर्भ 
  • रवींद्र अनासपुरे मुख्यालय प्रभारी पश्चिम महाराष्ट्र 
  • विश्वास पाठक मुख्यालय सह प्रभारी मुंबई 
  • नवनाथ बन मुख्य प्रवक्ता मुंबई 
  • कृष्णराज महाडिक युवा मोर्चा अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र 
  • चित्रा वाघ महिला मोर्चा अध्यक्ष मुंबई 
  • रामकृष्ण वेताळ किसान मोर्चा अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र 
  • योगेश टिळेकर ओबीसी मोर्चा अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र 
  • विश्वजित गायकवाड एससी मोर्चा अध्यक्ष मराठवाडा 
  • देवराव होळी एसटी मोर्चा अध्यक्ष विदर्भ 
  • नरेंद्र पवार भटके विमुक्त मोर्चा अध्यक्ष कोकण 
  • इद्रिस मुलतानी अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष मराठवाडा  

Leave a Comment

+