खेळाडू विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! १० वी-१२ वी परीक्षेत हक्काचे गुण मिळवण्यासाठी 'असा' करा अर्ज!

March 04, 2026 by Prakash Hande

Sports Grace Marks : चंद्रपूर : महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनेअंतर्गत राज्यराष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये प्रावीण्य प्राप्त केलेल्या इयत्ता 10 वी व 12 वी मधील पात्र खेळाडूंना क्रीडा सवलतीचे गुण प्रदान करण्यात येतातसन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी क्रीडा सवलत गुण प्रस्ताव सादर करण्याची ऑनलाईन प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहेसदर प्रस्ताव शासनाच्या "आपले सरकारपोर्टलद्वारे (https://aaplesarkar.mahaonline.gov.inया संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाचे आहेत. (आनंदवनातील विद्यार्थ्यांची आगळी-वेगळी होळी)

 

12 वीच्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेतील सहभाग व प्रावीण्यानुसार दिले जाणारे क्रीडा सवलत गुण प्रस्ताव यावर्षीपासून शासनाच्या आपले सरकार पोर्टलद्वारे केवळ ऑनलाइन स्वरूपात स्वीकारले जाणार आहेतयापूर्वी ही प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांमार्फत व्हायचीपरंतु चुकांमुळे काही विद्यार्थी वंचित राहायचेत्यामुळे मागील शैक्षणिक वर्षापासून संपूर्ण प्रक्रिया डिजिटल करण्यात आली असून अर्ज करण्यासाठी आपले सरकार पोर्टलचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे.

 

विद्यार्थ्यांनी जिल्हाविभागराज्य व राष्ट्रीयस्तरावरील क्रीडा स्पर्धांमधील सहभाग किंवा प्राविण्यासाठी सवलत गुण अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच आपले सरकार अॅप अथवा पोर्टलच्या माध्यमातून सादर करावाअर्जाची प्रत आपले सरकार पोर्टलद्वारे सर्वप्रथम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व त्यानंतर महाराष्ट्र राज्य ज माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळास पोहोचेलत्यामुळे विद्याथ्यांनी किवा शाळांनी प्रत्यक्षपणे अर्ज करू नयेआपले सरकार पोर्टलअॅपवर लॉगिन करून अर्ज भरणेखेळ व प्रमाणपत्रांची माहिती अपलोड करणेविहित कालावधीत अर्ज सादर करणेअर्जाची स्थिती पोर्टलवर नियमित तपासणे याबद्दलची नोंद शाळा व महाविद्यालयाच्या शिक्षकांनी घ्यावीक्रीडा सवलत गुणांसाठी सर्व संबंधितांनी आपले सरकार पोर्टलद्वारेच ऑनलाइन अर्ज भरावेतअसे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पूंड यांनी केले आहे. Aaple Sarkar Portal

Leave a Comment

+