Missing Minor Girl । शाळेतून घरी परतलीच नाही; कोरपना तालुक्यातील त्या मुलीचा शोध सुरू

April 09, 2026 by Prakash Hande

Missing Minor Girl Case : कोरपना (चंद्रपूर) - चंद्रपूर जिल्ह्यात मागील ३ महिन्यात १५ पेक्षा जास्त अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहे, यामध्ये काहींना फूस लावत पळविण्यात आल्याचा समावेश आहे. कोरपना तालुक्यात असाच एक प्रकार उघडकीस आला असून १५ वर्षाची अल्पवयीन मुलीला एकाने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. (शेट्टी गॅंग चा शेठ गुन्हे शाखेच्या ताब्यात)

 

जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता ५ वित शिक्षण घेणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ४ एप्रिलला शाळेत गेली होती, मात्र मुलगी सायंकाळ पर्यंत घरी न आल्याने कुटुंबाने तिचा सर्वत्र शोध घेतला, ती कुठेही आढळून आली नाही. गावातील २० वर्षीय मुलगा घरी नसल्याने कुटुंबाला त्याचेवर संशय आला.

 

अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाने त्या मुलावर फूस लावत पळविल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये ८ एप्रिलरोजी दिली आहे. जिल्ह्यात सतत अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता व फूस लावत पळविल्याच्या घटना घडत आहे, हि अत्यंत गंभीर बाब असून पोलीस या प्रकरणाचा लवकरच छडा लावतीलचं.

Leave a Comment

+