चंद्रपूर-नागपूरच्या खेळाडूंची होणार अग्निपरीक्षा! मिशन लक्ष्यवेधसाठी 'हे' निकष आहेत अनिवार्य

February 27, 2026 by Prakash Hande

Mission Lakshyavedh 2026 : चंद्रपूर :  क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत मिशन लक्ष्यवेध ही योजना राबविण्यात येत आहेसदर योजनेंतर्गत विभागीय क्रीडा निपुणता केंद्रउपसंचालक क्रीडा व युवक सेवा नागपूर विभागनागपूर येथे स्थापन करण्यात येणार आहेत्याअनुषंगाने टेबल टेनिस आणि अॅथलेटिक्स या क्रीडा प्रकाराची निवड चाचणी विभागीय क्रीडा संकुलनागपूर येथे आयोजित करण्यात येणार आहे. (गटई कामगारांसाठी आनंदाची बातमी)

 

सदर निवड चाचणी करिता निकष खालीलप्रमाणे आहे.

अॅथलेटिक्स : वयोमर्यादा 25 वर्षाआतील मुले मुली. (त्या  वर्षाच्या 31 डिसेंबर रोजी)

आवश्यक कागदपत्रे : जन्म दाखलाशाळा सोडल्याचे प्रमाणपत्रअधिवास प्रमाणपत्रआधार कार्डगत वर्षातील क्रीडा विषयक कामगिरीचे प्रमाणपत्रपासपोर्ट साईज फोटोग्राफ , शाळा/महाविद्यालय बोनाफाईड प्रमाणपत्रपालकाचे संमती पत्र इमहाराष्ट्र राज्यातील खेळाडू असला पाहिजे.  राज्यस्तरावरील पदक प्राप्त खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरावरील सहभागी खेळाडूगत वर्षाच्या क्रीडा कामगिरीचे मुल्यमापन करण्यात येऊन क्रीडा कौशल्य तंदुरुस्ती चाचण्यांमध्ये पात्र होणे आवश्यकशासन मान्यताप्राप्त डॉक्टराकडून दिलेले वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य.

 

टेबल टेनिस : वयोमर्यादा  25 वर्षाआतील मुलेमुली (त्या वर्षाच्या 31 डिसेंबर रोजी)

आवश्यक कागदपत्रे जन्म दाखलाशाळा सोडल्याचे प्रमाणपत्रअधिवास प्रमाणपत्रआधार कार्डगत वर्षातील क्रीडा विषयक कामगिरीचे प्रमाणपत्रपासपोर्ट साईज फोटोग्राफ  ,शाळा/महाविद्यालय बोनाफाईड प्रमाणपत्रपालकाचे संमती पत्र इ.  महाराष्ट्र राज्यातील खेळाडू असला पाहिजेराज्यस्तरावरील पदक प्राप्त खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरावरील सहभागी खेळाडूगत वर्षाच्या क्रीडा कामगिरीचे मुल्यमापन करण्यात येऊन क्रीडा कौशल्य व तंदुरुस्ती चाचण्यांमध्ये पात्र होणे आवश्यकशासन मान्यताप्राप्त डॉक्टरांकडून दिलेले  वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य. Athletics Selection

 

निवड चाचणीकरीता जास्तीत जास्त खेळाडूंनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयचंद्रपूर येथे 10 मार्च 2026 पर्यंत कार्यालयीन वेळेत आपली नोंदणी करावीअसे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी कळविले आहेअधिक माहितीकरिता क्रीडा मार्गदर्शक विजय डोबाळे यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Comment

+