MSEDCL Cheque Bounce : चंद्रपूर:- थकीत वीज बिलासाठी महावितरण ची वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई थांबवीत वटवले न जाणारे धनादेश देत महावितरणची दिशाभूल करत वेळ मारून नेणाऱ्या वीज ग्राहकांवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय चंद्रपूर परिमंडळाने घेतला आहे. त्यामुळे धनादेश देतानाच ते योग्यरीत्या भरून द्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता हरीश गजबे यांनी केले आहे. (लोहारडोंगरी खाण रद्द करा, ५ मार्चपासून बंडू धोतरे यांचं अन्नत्याग सत्याग्रह)
महावितरणच्या लघुदाब वर्गातील वीज ग्राहकांनी वीजबिल भरण्यासाठी दिलेल्या धनादेशांपैकी चंद्रपूर परिमंडळात दरमहा सरासरी 50 धनादेश अनादरीत (चेक बाऊन्स) होत असल्याचे लक्षात आले. परंतू महावितरणच्या असे लक्षात आले की, काही वीज ग्राहकांनी दिलेल्या धनादेशावर चुकीची तारीख, खाडाखोड, चुकीची स्वाक्षरी, चुकीचे नाव, खात्यात पुरेशी रक्कम नसणे आदी कारणांवरून धनादेश अनादरीत होत असल्याचे आढळून आले आहे. परिणामी वीज बिलाची वसूल न होता थकबाकीत वाढ झाली आहे. त्यामुळे महावितरणने मोहीम घेत धनादेश अनादर झालेल्या वीज ग्राहकांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या दृष्टीने हालचालींना गती दिली आहे.
यासोबतच महावितरणने आता दिशाभूल करणाऱ्या वीज ग्राहकांविरोधात कायदेशीर कारवाईची मोहीम हाती घेतली असून, या धनादेशाद्वारे विज बिल भरण्याची सोय केली आहे जर धनादेश अनादरीत झाल्यास ही सोय सहा महिन्यांसाठी निलंबित होणार आहे. धनादेश बाऊन्स झाल्यास वीज ग्राहकांना प्रत्येक वीज बिलासाठी विलंब आकार अधिक जीएसटी करासह 885 रुपयांचा दंड संबंधित ग्राहकाच्या पुढील महिन्याच्या वीज बिलामध्ये इतर आकार म्हणून समाविष्ट करण्यात येत आहे. तसेच अनादरीत झालेल्या एकाच धनादेशाद्वारे अनेक वीज बिलांचा भरणा केलेला असल्यास प्रत्येक वीजबिलासाठी स्वतंत्र दंडात्मक आकार लावण्यात येते. MSEDCL Cheque Bounce
यासोबतच धनादेशाद्वारे वीज बिल भरण्याची सोय सहा महिन्यांसाठी निलंबित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. ग्राहकांविरुद्ध निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881, कलम 138 अंतर्गत गुन्हा दाखल केला जाणार आहे.
Leave a Comment